PCOD जनजागृतीसाठी आमदार दीपक भाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात मार्गदर्शन सेमिनार

PCOD जनजागृतीसाठी आमदार दीपक भाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात मार्गदर्शन सेमिनार

*कोंकण एक्सप्रेस*

*PCOD जनजागृतीसाठी आमदार दीपक भाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात मार्गदर्शन सेमिनार..*

*दोडामार्ग / शुभम गावस*

आमदार दीपक भाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात संयुक्त जिज्ञासा कोंकणच्या उपक्रमांतर्गत 20 नोव्हेंबर रोजी विद्यार्थिनींसाठी PCOD (Polycystic Ovarian Disease) विषयावर जनजागृती सेमिनार आयोजित करण्यात आला. मुलींमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या या आरोग्यविषयक समस्येबाबत योग्य माहिती पोहोचवणे आणि जीवनशैलीत बदल करून हा विकार कसा नियंत्रणात आणता येऊ शकतो याविषयी मार्गदर्शन करणे हा सेमिनारचा प्रमुख हेतू होता.
सेमिनारदरम्यान तज्ज्ञांनी PCODची लक्षणे, संभाव्य कारणे, संतुलित आहाराचे महत्त्व, नियमित व्यायाम, ताण-तणाव कमी करण्याचे उपाय तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ल्याची गरज याबद्दल सविस्तर माहिती दिली. उपस्थित विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक मार्गदर्शन करत त्यांना योग्य दिशादर्शन केले.
सेमिनारमुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढली असून हा उपक्रम माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक ठरल्याचे मत विद्यार्थिनींकडून व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!