नितेश राणे विरुद्ध अजब युती ठाकरे शिंदे गट एकत्र

नितेश राणे विरुद्ध अजब युती ठाकरे शिंदे गट एकत्र

*कोंकण एक्सप्रेस*

*नितेश राणे विरुद्ध अजब युती ठाकरे शिंदे गट एकत्र*

*एकमेकांवर प्रचंड टोकाची टीका करणारे सिंधुदुर्गात मात्र एकत्र*

*कणकवली ः संजना हळदिवे*

नितेश राणे विरुद्ध सर्वपक्षीय नेते एकवटलेत कणकवली नगरपंचायतीसाठी शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाची अजब युती झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ठाकरे गटाच्या उमेदवाराला समर्थन दिले कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना शिवसेना शिंदे गटाचे समर्थन आहे तर संदेश पारकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे उपनेते संजय आंग्रे आणि माजी आमदार राजन तेली उपस्थित होते .पालकमंत्री नितेश राणेंना रोखण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाची अजब युती तिथे झाली आहे आणि ठाकरे आणि शिंदेंच्या एकीने राज्यामध्ये आणखी एक अजब गजब अशी युती आघाडीचा उदय झाला आहे.

नितेश राणे यांच्या विरोधात सिंधुदुर्गात अजब आणि गजब अशी युती आहे. दररोज एकमेकांवर प्रचंड टोकाची टीका करणारे ठाकरे विरुद्ध शिंदे सिंधुदुर्गामध्ये मात्र ठाकरे आणि शिंदे ही एकत्र युती आहे ते नितेश राणे यांच्या विरोधात रणांगणात उतरले आहेत. एकंदरीत बघितलं तर शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर अधिकृत ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत त्यांच्यासाठी शिवसेना शिंदे गट उघडपणे समर्थनात मैदानात उतरल्याने नितेश राणे यांच्या विरोधात जवळपास सर्वच पक्षाचे प्रमुख नेते यांनी एक आघाडी केली आणि त्यामध्ये खास करून शिंदे आणि ठाकरे एकत्रपणे या गटामध्ये उतरलेले पाहायला मिळतात यामध्ये शिंदे गटाचे दोन्ही नेते आणि संजय आंग्रे यांनी संदेश पारकर यांचा अर्ज भर ण्यासाठी आज उपस्थिती लावली होती आणि या सोबतच थेटपणे प्रचाराच्या मैदानात देखील ठाकरे आणि शिंदे एकत्र पाहायला मिळतील आणि त्यामुळे एकंदरीत बघितलं तर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्यावेळेस एक वेगळी युती राज्यात पाहायला मिळाली होती आता मात्र ठाकरे आणि शिंदे एकत्र आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एक अजून एक मोठी आणि अजब गजबाची युती त्या ठिकाणी पाहायला मिळते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!