नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी २२ अर्ज दाखल

नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी २२ अर्ज दाखल

*कोंकण एक्सप्रेस*

*नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी २२ अर्ज दाखल*

*वेंगुर्ला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत एकूण नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी ११३ उमेदवारी अर्ज*

*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आतापर्यंत थेट नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ तर २० नगरसेवक पदासाठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून अर्ज छाननी व उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी नंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गट या निवडणुकीत एकही अर्ज दाखल करू शकले नाही.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विलास गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,
तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून नगरसेवक पदासाठी मनीष सातार्डेकर,जी जी टाककर,आणि सचिन वराडकर यांनी अर्ज सादर केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश सचिव एम के गावडे,वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, शहर अध्यक्ष सुरज परब,जिल्हा सचिव सुशील चमणकर,महिला तालुकाध्यक्ष ऋतुजा शेटकर,युवक अध्यक्ष गजानन कुंभार,युवती अध्यक्ष निधी शिरोडकर,ओबीसी उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर आदी उपस्थित होते.
आज नगराध्यक्ष पदासाठी विनायक सदानंद गवंडळकर( भाजप), विलास प्रभाकर गावडे (काँग्रेस) आणि नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र. १ ब
ॲड. मनिष वामन सातार्डेकर (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
वंदन मेघः शाम वेंगुर्लेकर (अपक्ष)
प्रभाग क्र. २ अ
महिमा महेंद्र घाडी (शिवसेना)

प्रभाग क्र. २ ब
विधाता रमाकांत सावंत (काँग्रेस)

प्रभाग क्र. ३ अ
विनायक सदानंद गवंडळकर (भाजप)

प्रभाग क्र. ५ ब
विवेक श्रीगुरुनाथ कुबल (उबाठा)
सुयोग विजय चेंदवणकर (अपक्ष)
सुनिल शशिकांत डुबळे
(शिवसेना)

प्रभाग क्र. ६ अ
गितांजली गजानन गांवकर
(शिवसेना)

प्रभाग क्र. ७ अ
सुकन्या पॉल फर्नांडीस (काँग्रेस)

प्रभाग क्र. ७ ब
बाळकृष्ण पुंडलिक हुले (शिवसेना)

पांडुरंग लक्ष्मण मालंडकर
(काँग्रेस)

ॲड. गोविंद गोपाळ टाककर (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग क्र. ८ अ
सुकन्या पॉल फर्नांडीस (काँग्रेस)

सुमन संदेश निकम (उबाठा)

प्रभाग क्र. ८ ब
संदेश प्रभाकर निकम (उबाठा)

अमर भास्कर जाधव(भाजप)

अब्दुलरहिम अल्ली शेख (काँग्रेस)
अजित यशवंत कनयाळकर(भाजप)

प्रभाग क्र. ९ अ
सचिन फटू वराडकर
(अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस)

चंद्रकांत कृष्णा जाधव (अपक्ष)

प्रभाग क्र. ९ ब
रत्नप्रभा सोमनाथ टोमके (अपक्ष)
यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्या १८ नोव्हेंबर रोजी सकाळी दाखल उमेदवारी अर्ज यांची छाननी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!