*कोंकण एक्स्प्रेसस*
*नवीन रेशन कार्ड काढायचं? घरबसल्या करू शकता अर्ज, जाणून घ्या*
━━━━━━━━━━━━━
💁🏻♀️ सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आता रेशनकार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करू शकता.
🧑💻 नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
1️⃣ तुमच्या राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://mahafood.gov.in/
2️⃣ तुमच्या आयडीने लॉग इन करा किंवा नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा.
3️⃣ ‘Apply online for ration card’ या पर्यायावर क्लिक करा.
4️⃣ आवश्यक कागदपत्रे (ओळख पुरावा आणि इतर) अपलोड करा.
5️⃣ सर्व माहिती भरा आणि अर्ज शुल्क भरा.
6️⃣ तुम्हाला एक पोचपावती (receipt) मिळेल.
📑 कोणती कागदपत्रे लागतील?
✔️ आधार कार्ड
✔️ मतदार ओळखपत्र
✔️ वीज बिल किंवा पाणी बिल
✔️ उत्पन्नाचा दाखला
🧐 रेशन कार्ड कधी काढता येते?
रेशन कार्ड 18 वर्षानंतर काढता येते. या रेशन कार्ड मध्ये 18 वर्षाखालील कमी वयोगटातील मुलांची नावे देखील टाकता येतात.

