श्री देवी माऊली तिरोडा वार्षिक जत्रौत्सव 25 नोव्हेंबरला

श्री देवी माऊली तिरोडा वार्षिक जत्रौत्सव 25 नोव्हेंबरला

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री देवी माऊली तिरोडा वार्षिक जत्रौत्सव 25 नोव्हेंबरला*

*सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) :- प्रतिनिधी*

तिरोडा गांवची ग्रामदेवता श्री देवी माऊली वार्षिक जत्रौत्सव मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके 1947 मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त सकाळी सर्व देवतांवर महाआभिषेक, समाराधना, ओटी भरणे, केळी ठेवणे व मानवणे, नवस बोलणे व फेडणे दुपारी 02.00 वाजता सामुहिक गाऱ्हाणे व महाप्रसाद रात्रौ 11.00 वाजता दीप उजळणे व फटाक्याची आताषबाजी, रात्रौ 11.30 वाजता ढोल ताश्याच्या गजरात श्रीं ची सर्व मंदिराकडे पालखी मिरवणूक, रात्रौ 01.30 वाजता आजगांवकर दशावतार नाट्यमंडळ आजगांव ( सावंतवाडी -सिंधुदुर्ग ) यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग.तरी सदर कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती तिरोडा, तिरोडा ग्रामविकास मंडळ & श्री देवी माऊली नाट्य निकेतन मंडळ मुंबई व ग्रामस्थ तिरोडा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!