सिधुदुर्गनगरीत सर्वधर्मीयाचा पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा

सिधुदुर्गनगरीत सर्वधर्मीयाचा पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा

*कोंकण एक्स्प्रेसस*

*सिधुदुर्गनगरीत सर्वधर्मीयाचा पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा*

*सिधुदुर्गनगरी*

जिल्ह्यात सर्व धर्मीय एकोप्याने व सलोख्याने नांदत असताना अल्पसंख्यांक बांधवांना धमकावण्याचे व त्यांचे व्यवसाय बंद पाडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत अशा व्यक्तींना आळा घालावा या मागणीसाठी करत आहोत

सिंधुदुर्ग नगरी येथे आजआज आम्ही भारतीय च्या वतीने सर्व धर्मीय बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला
या वेळी माजी आमदार वैभव नाईक, सामाजीक महिलानेत्या कमलताई परूळेकर,ऍड संदीप निंबाळकर, महेश परूळेकर, सतिश लळीत,डॉ जयेंद्र परूळेकर, मुस्ताक शेख सरफराज नाईक इजाज नाईक रफिक मेमन यांच्यासह सर्व धर्मीय बांधव या मोर्चात सहभागी झाले होते

.     सिंधुदुर्ग जिल्हा तसेच संपूर्ण राज्यात अल्पसंख्यांक समुदाय यांचेवर होणारे हल्ले तसेच अल्पसंख्यांक समुदायाकडून खरेदी विक्री करू नये अशा स्वरूपाच्या पोस्ट समाजमाध्यमांवर पसरविल्या जात आहेत. अल्पसंख्यांक समुदायाच्या विरोधात विव्देषपुर्ण विधाने, पोस्ट व व्हिडीओ प्रसारीत करून त्यांच्या विरोधात जाणीवपुर्वक विनाकारण द्वेष  निर्माण करण्याचे प्रकार सर्वत्र घडत आहेत. त्या सर्व घटनांमुळे या जिल्हयातील व राज्यातील अल्पसंख्य समुदाय तसेच संविधान प्रेमी नागरीक व्यथीत झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हयातील बांदा व दोडामार्ग येथील घटना पाहाता अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्तींच्या विरोधात विनाकारण विव्देष निर्माण करण्याचा व संविधानाने दिलेला आपल्या मर्जीचा व्यवसाय करण्याचा संविधानिक अधिकार झुंडशाहीच्या जोरावर बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. यातून निर्माण झालेल्या आर्थीक कोंडीमुळे बांदा येथील फुल विक्रेता आफताब शेख याने आत्महत्या केली. सदरचे प्रकरण मागील चार ते सहा महिने पोलीस व प्रशासनासमोर संबंधीत कुटुंब मांडत होते. परंतु पोलीस व प्रशासनाने या प्रकरणात सन्माननीय तोडगा काढण्यासाठी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आफताब शेख सारख्या व्यक्तीस आत्महत्या करावी लागली.
दोडामार्ग येथील प्रकरणात पोलीस गुन्हेगारांच्या विरूध्द कायदेशीर कारवाई करून गुन्हयाचा तपास करीत असताना या प्रकरणात  राजकीय नेते व संघटना आरोपीच्या समर्थनार्थ चिथावणीखोर भाषणे करून जिल्हातील सलोखा व बंधुता नष्ट करीत असताना आढळतात. वरील प्रकरणामध्ये उघड व चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्ती व संघटनांच्या विरूध्द पोलीस यंत्रणा कोणतिही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे सदरच्या व्यक्ती व संघटना अधिक आक्रमक होवून अल्पसंख्य समुदायाला दहशतीत ठेवण्याच्या उददेशाने सार्वजनिक ठिकाणी पोलीसांच्या उपस्थितीत प्राणघातक हत्यारे घेवून मिरवणुका काढतात.
आफताब शेख प्रकरणामध्ये पोलीसांनी हेतुपुरस्सर संबंधीत आरोपींच्या विरूध्द फिर्याद नोंदविण्यासाठी विलंब केला आहे. तसेच संबंधीत आरोपींना अटकपुर्व जामीन मिळेल अशी स्थिती निर्माण केलेली आहे. यामुळे या गुन्हयाचा योग्य तपास सिंधुदुर्ग पोलीसांकडून होईल असा विश्वास आफताब शेख कुटुंबियांना वाटत नाही.
यामुळे आफताब शेख प्रकरणी स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टिम गठीत करून या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करून गुन्हेगारास शासन होईल यासाठी सर्व ते आदेश शासनाने दयावेत.सिंधुदुर्ग जिल्हयातील व राज्यातील धार्मिक व जातीय सलोखा व बंधुभाव नष्ट करण्याच्या हेतूने जाहीर वक्तव्य, सोशल मिडीयावर पोस्ट व व्हिडीओ प्रसारीत करणाऱ्या व्यक्ती व संघटना यांचेवर त्वरीत कायदेशीर कारवाई करण्यात यावी.आपल्या जिल्हयात साटेली-भेडशी, सावंतवाडी व बांदा येथे अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्तींना त्यांचा व्यवसाय करण्यापासून अटकाव केला जातो. त्यांच्या विरोधात संविधान विरोधी ठराव स्थानीक स्वराज्य संस्थांमधून केले जातात. अशा ठिकाणी पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी यांनी याची त्वरीत दखल घेवून संबंधीत व्यक्तींना व्यवसाय करण्यास अटकाव करणाऱ्या व्यक्ती व संघटनांवर कारवाई करावी तसेच संबंधीत व्यावसायिकांना त्यांचा निर्भयपणे व्यवसाय करता येईल अशी व्यवस्था निर्माण करावी. समाजात शांतता व सदभाव रहावा यासाठी ज्या गावात, शहरात अल्पसंख्यांक समाजाची वस्ती आहे, तेथे मोहल्ला कमिटीची नव्याने स्थापना करावी. मोहल्ला कमिटीमध्ये पोलीस प्रशासनाची व्यक्ती व सर्व धर्मातील शांतताप्रेमी व्यक्ती (त्यांचा पुर्व इतिहास विचारात घेवून) यांची सभासद म्हणून नियुक्ती करण्यात यावी. मोहल्ला कमिटीची बैठक किमान महीन्यातून एकदा घेण्यात यावी व त्या बैठकीत त्या गावातील, शहरातील सलोखा, शांतता, बंधुभाव टिकविण्याच्या हेतूने सर्व धर्मिय लोकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात यावेत.तसेच समाज माध्यमांवर विव्देष पसरविणाऱ्या पोस्ट संबंधीत यंत्रणांना निर्देश देवून त्या पोस्ट समाज माध्यमांमधून डिलीट करण्याची प्रक्रीया तातडीने पोलीस प्रशासनाने करावीआदी मागण्या केल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!