पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला शवपेटी प्रदान

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला शवपेटी प्रदान

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला शवपेटी प्रदान*

*कणकवली : प्रतिनिधी*

पालकमंत्री श्री. नितेशजी राणे यांच्या पुढाकाराने कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन शवपेटी प्रदान करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गावातील तसेच परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कळसुली गावाअंतर्गत एकूण आठ महसुली गावे असून, गावाची लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार मोठा आहे. त्यामुळे कोणाचे निधन झाल्यास शवपेटीची तातडीची आवश्यकता भासत असे. या समस्येची दखल घेत कळसुली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सचिन पारधिये यांनी पालकमंत्री श्री. नितेशजी राणे यांच्याकडे शवपेटीची मागणी केली होती.

या मागणीस तात्काळ प्रतिसाद देत पालकमंत्री राणे यांनी पुढाकार घेऊन कळसुली गावासाठी शवपेटी उपलब्ध करून दिली. सदर शवपेटी प्राथमिक आरोग्य केंद्र, कळसुली येथे ठेवण्यात आली असून, तिचा उपयोग गावातील तसेच परिसरातील मृतदेह ठेवण्यासाठी होणार आहे.

या उपक्रमाबद्दल सरपंच श्री. सचिन पारधिये यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ग्रामस्थांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!