वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार*

वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार*

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार*

*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (अजितदादा पवार गट) बैठक तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कॅम्प येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पार पडली. यात बैठकीत वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुक स्वबळावर लढविण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
या बैठकीला महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, जिल्हा सचिव सुशिल चमणकर, युवा कार्यकर्ते अनंतराज पाटकर, शहर अध्यक्ष सुरज परब, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, महिला तालुका ऋतुजा शेटकर, शहर अध्यक्ष सुचिता परब, ग्रामपंचायत सदस्य संदिप सातार्डेकर, राजेंद्र अमरे, तालुका युवा अध्यक्ष गजानन कुंभार, ओबीसी उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर, सुप्रिया जाधव आदी उपस्थित होते. आगामी निवडणुक स्वबळावर लढताना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!