*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी हायस्कूल चे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांचा सेवापूर्ती सत्कार भावूक व उत्साहात संपन्न*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील साळशी माध्यमिक विद्यामंदिर साळशी प्रशालेचे प्र.मुख्याध्यापक श्री माणिक वंजारे सर हे नियत वयोमानानुसार दि.31 ऑक्टोबर, 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त “शुभेच्छा व सत्कार समारंभ “उत्साही व भावूक वातावरणात संपन्न झाला.
साळशी ग्रामविकास मंडळ, साळशी आयोजित या समारंभाचे अध्यक्ष स्थान सत्यवान सावंत यांनी स्विकारले. दिप प्रज्वलन व सरस्वती पूजनांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली . सत्कारमूर्ती माणिक वंजारे सर यांच्या हस्ते सुरुवातीस सरस्वती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचीसुरुवात झाली.
प्रथम प्र.मुख्या. मराठी संजय सर यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले . त्यानंतर आजी-माजी विद्यार्थ्यांनी मा.श्री.वंजारे सरांच्या 34 वर्षाच्या प्रशालेतील त्यांच्या कार्याचा गौरगोउदगार काढताना सर्व भावुक झाले.
नोकरी व्यवसाय निमित्त बाहेर असणाऱ्या वंजारे सरांच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी सरांना शुभेच्छा दिल्या, त्याचे प्रकट वाचन करण्यात आले. यामध्ये प्रसाद साळस्कर प्रशिल लाड,डॉ. रूपाली घाडी निलेश गावकर, महेश सावंत, अजय लाड, रिंकू -लोचनी व आशिष परब, सुभाष पाडावे इ.च्या मनोगताचे प्रकट वाचन केले.
श्री वंजारे सराची मुलगी व जावई म्हणजे स्त्रियांची मुलगी शब्दश्री व जावई नितेश यांनी पाठवलेल्या संदेशेच्या वाचन सरांची मेहुणी डॉ.अनिता शिंदे यांनी अत्यंत उगवत्या शैलीत केले, नातेवाईकांपैकी मुलगा अथर्व,पत्नी सौ. समिधा, मेहुणी योगिनी पांडव यांनी सरांच्या विषयी आपल्या भावना प्रकट केल्या.
उपस्थित मान्यवरांपैकी वैशाली सुतार (सरपंच -साळशी), वैभव साळस्कर (माजी सरपंच- साळशी), गाडे सर (केंद्रप्रमुख -साळशी), सत्यवान भोगले (चेअरमन- स्कूल कमिटी), प्रभाकर साळस्कर उपाध्यक्ष- संस्था), विजय सुतार (खजिनदार -संस्था), संतोष साळस्कर (सदस्य- संस्था), साटम सर(सहा. शिक्षक)इ.नी माणिक वंजारे सर यांच्या प्रशालेतील 34 वर्षाच्या कार्याचा आढावा घेत,त्यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले.
मा. किशोरजी लाड (मुंबई) यांनी वंजारे सरांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या दिर्घ सेवेविषयी, तसेच त्यांनी प्रशालेसाठी घेतलेल्या मेहनतीविषयी प्रशंसा केली.
संस्थेचे अध्यक्ष सत्यवान सावंत, मा. किशोर लाड,वैशाली सुतार, अन्य अन्य मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत सौ.समिधा वंजारे यांना साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला.त्यानंतर सत्कारमूर्ती श्री. मा.श्री.माणिक वंजार सर यांचा शाल,श्रीफळ, भेटवस्तू,जीवनगौरव सन्मान पत्र देऊन सर्वांच्या उपस्थितीत सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
सेवामुर्ती श्री.माणिक वंजारे सर (प्र.मुख्या. ) यांनी सत्कार व शुभेच्छा दिल्या बद्दल आभार व मनोगत व्यक्त करताना आपल्या 34 वर्षाच्या कार्याविषयीचा उहापोह करताना, आलेल्या समस्या,अडचणी तसेच उल्लेखनीय बाबींचा उल्लेख करताना भावुक झाले. संस्था, पालक, ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी व हितचिंतक या सर्वांचे आभार मानत प्रशालेस मी कधीही विसरू शकणार नाही असे भावूक मनोगत व्यक्त करताना वातावरण भावूक झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सत्यवान सावंत (अध्यक्ष- संस्था( यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. मा. वंजारे सरांच्या 34 वर्षाच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या कार्याविषयी गौरव उद्गगार काढले. त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या विषयी संस्था त्यांना पूर्णतः सहकार्य करेल याची ग्वाही देतो. असे सांगितले.
शेवटी आभार प्रदर्शनानंतर या भावस्पर्शी व स्मरणीय समारंभाचा समारोप करण्यात आला.
या पूर्ण समारंभाचे सूत्रसंचालन श्री भरणकर सर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले.

