डेगवे-मोयझरवाडीतील २९ वर्षीय युवक माकडताप पॉझिटिव्ह

डेगवे-मोयझरवाडीतील २९ वर्षीय युवक माकडताप पॉझिटिव्ह

*कोकण Express*

*डेगवे-मोयझरवाडीतील २९ वर्षीय युवक माकडताप पॉझिटिव्ह…*

*बांदा ः प्रतिनिधी*

कोनशी येथे माकडताप बाधित रुग्ण सापडल्यानंतर आज डेगवे-मोयझरवाडी येथील २९ वर्षीय युवक माकडताप पॉझिटिव्ह आढळला. ही माहिती डेगवेचे माजी उपसरपंच मधुकर देसाई यांनी दिली. गेल्या दोन दिवसात दुसरा रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

या युवकाला ताप येत असल्याने त्याला मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचार घेतल्यानंतर त्याला आज घरी सोडण्यात आले. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. आज त्याचा पॉझिटिव्ह अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला.
डेगवे गावात यापूर्वी देखील माकडताप बाधित रुग्ण सापडले आहेत. यावर्षी हा पहिलाच रुग्ण सापडला आहे. आरोग्य विभागाने खबरदारीसाठी वाडीत सर्वेक्षण सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!