अफाट कार्यक्षमता असलेला श्री अरुण रामकृष्ण इंगळे

अफाट कार्यक्षमता असलेला श्री अरुण रामकृष्ण इंगळे

*कोंकण एक्सप्रेस*

*अफाट कार्यक्षमता असलेला श्री अरुण रामकृष्ण इंगळे*

*कणकवली  : प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत आपल्या अंगभूत कौशल्याने आणि कार्यकर्तृत्वाने झपाटून काम करणारे अनेक चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यागी जीवन अर्पूण सेवाकाळ पूर्ण करून निवृत्त झाले तरी आपल्या कामाची ओळख मागिल पिढीच्या आठवणीत कायम ठेवून गेले आहेत त्यामध्ये कै दत्तू परब कै वसंत घाडीगावकर कै . गंगाराम घाडीगावकर कै . मनोहर फास्ते हे कर्मचारी अल्पशिक्षित जरी असले तरी विद्येच्या प्रांगणात वाहून घेतले होते . शाळा आणि समाज यांच्याप्रति अफाट जिव्हाळा असलेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी विद्यामंदिर प्रशालेला लाभले म्हणून शाळेचा परिसर विविध वृक्षांनी बहरून गेला तसेच सेवाभाव ही वृत्ती आणि कर्तव्य समजून जीवापाड लळा लावला याच मालिकेत अकोला जिल्ह्यातील आगर गावचा श्री अरुण रामचंद्र इंगळे हा दुर्गम भागातील परिस्थितीने पिचलेला आणि जगण्याची धडपड असलेला तरुण कुडाळ शहरात गाववाले एसटी चालक व वाहक यांना मदत करत करत रिकाम्या वेळेत लिंबू विकून उदरनिर्वाह चालवत होता . याचवेळी विद्यामंदिर प्रशालेत शिपाई पदाची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आणि अरुण इंगळे मुलाखतीसाठी शाळेत १९९५ साली हजर झाले त्यावेळच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी जेष्ठ मंडळीनी अनेक उमेदवार पारखून पारखून संस्थेचे चेअरमन कै . केशवरावजी राणे साहेब व संस्थेचे पदाधिकारी यांनी तरूण उमद्या उमेदवाराची निवड केली तो तडफदार भोळाभाबडा उमेदवार होता श्री अरुण रामकृष्ण इंगळे . पहिल्याच दिवशी शाळेत त्यावेळचे मुख्याध्यापक कै . सुभाष तावडे सरांनी हजर करून घेतले आणि अरुणच्या कार्याला शुभारंभ झाला . पहिल्याच दिवसा पासून अरुणने कामावर जीवापाड प्रेम करून कामाची निष्ठा जोपासली . हळूहळू अरुणचे कामच सर्व शाळेला आपलेसे झाले कोणतेच काम करतांना अरुण कंटाळत नसे कधी त्यानं आळस केला नाही अरुणची भाषा वेगळी जरी असली तरी कणकवली शहरात अरुण आपल्या कर्तव्य भावनेने आणि कामालाच देव समजून सेवा करत राहिल्याने सर्वांच्या आत्मियतेचा आणि जिव्हाळ्याचा झाला . अरुणचा स्वभाव शांत ‘ लाजाळू प्रामाणिक सर्वांवर प्रेम करणारा शाळेच्या निर्जिव भिंतींनाही आपलेसे वाटणारा शाळेचा परिसर झाडापेडाणी बहरून सोडणारा वृक्षांवर फुलांवर भरभरून जीव ओतणारा अरुण कामापुढे त्यानं कधिच वेळेचे बंधन पाळले नाही सुट्टी त्याला माहित नाहीच कोणत्याही वेळेला अरुणला हाक मारा त्या वेळेत अरुण शाळेत हजर शाळेच्या प्रत्येक घटकात एकरूप होऊन अरुणने काम केले शाळेतील विद्यार्थी वर्गावर अरुणची फार निष्ठा होती विद्यार्थ्यांना हळूवार जपणारा अरुण त्यांच्या स्वच्छतेविषयी नेहमी सहजग होता . पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृहाची व्यवस्था परिसराची स्वच्छता अरुण भल्यापहाटे येऊन करत असे वर्गांची स्वच्छता करत असतांना संपूर्ण शाळेत अरुण एकटाच असायचा पण काम करत असतांना त्यानं आपल्या पहाडी आवाजात गाण्याची साथ देवून अवघड काम सोपे करून आनंद मानला म्हणून त्याच्या कामाची महती संपूर्ण जिल्ह्यात पसरली कोणतीही प्रसिद्धी न करता अरुण संस्थेचा आणि शासकीय अधिकारी यांचा लाडका झाला .
अरुण हा अतिप्रामाणिक आणि साधा माणूस शाळेतील कोणतेही काम मनलावून करून शिक्षक आणि पालक यांच्या मनात रूतून बसला . अरुणला भौतिक साधनांची कधिच आस नाही . आयुष्यभर चालने हा एकच ध्यास आणि काम हेच दैवत म्हणून त्यांनं कोणावर ईर्षा कधिच केली नाही गर्व केला नाही शाळेबरोबर अरुणने कुटुंबावर देखिल भरभरून प्रेम केले . त्याची तिन्ही मुले उच्च शिक्षित झाली अजूनही शिक्षण घेत आहेत आपल्या मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत यासाठी त्याची धडपड सतत असते विद्यामंदिर प्रशालेला लाभलेला हा आदर्श कर्मचारी आहे अरुणचे काम हेच त्याचे दैवत बनले म्हणूनच त्याने कामातच उच्च क्षमता पाहिल्या आणि सर्वांचा हृदयापर्यंत जावून बसला . कर्तव्य सेवा श्रेष्ठ असते हे मूल्य शेवट पर्यंत जोपासून अरुण इंगळे प्रशाळेतून ३० वर्ष सेवा करून आज ३१ ऑक्टोंबर २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होत आहेत त्यांचे भावी आयुष्य सुखा समाधानात आणि आरोग्यपूर्ण जावो हिच त्यांना शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!