*कोंकण एक्सप्रेस*
*108 प्रमाणे 102 रुग्णवाहिका सेवा सुरू केल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा*
जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात वेळेवर वैद्यकीय मदत पोहोचवण्यात अनेकदा अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत 108 प्रमाणेच 102 क्रमांकावर विनामूल्य रुग्णवाहिका सेवा सुरू केल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
सध्या 108 सेवा अपघातग्रस्त, आपत्कालीन रुग्णांसाठी कार्यरत आहे. परंतु गरोदर महिला, जेष्ठ नागरिक, दीर्घकालीन आजार असणारे रुग्ण यांना नियोजित प्रवासासाठी वाहतूक उपलब्ध नाही. 102 सेवा सुरु झाल्यास हे रुग्ण घरापासून उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवता येतील.

