*कोंकण एक्सप्रेस*
*तळेरे येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचे भक्तिमय वातावरणात भूमिपूजन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
तळेरे गावठण येथील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवारी भक्तिमय आणि उत्साहात पार पडला. यावेळी तळेरे सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमारे 100 वर्षांपूर्वीचे असलेले हे मंदिर पूर्णपणे नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. हे श्री. विठ्ठल रखुमाई मंदिर जीर्ण झाले होते. मुंबई स्थित ग्रामस्थ आणि गावातील ग्रामस्थ यांची संयुक्त सभा होऊन हे मंदिर बांधकाम करण्याचे ठरले. त्यानुसार हे मंदीर नवीन बांधकाम करावयाचे असून त्याचा भूमिपूजन सोहळा बुधवारी उत्साहात झाला. यावेळी गावातील आणि मुंबईस्थित ग्रामस्थ उपस्थित राहणार असून गावातील मानकरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी पंचक्रोशीतील भाविक, वारकरी, ग्रामस्थांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल श्री. विठ्ठल रखुमाई मंदिर जीर्णोद्धार समितीने आभार व्यक्त केलेत.

