*कोंकण एक्सप्रेस*
*दिविजा वृध्दाश्रमास नवदुर्गा युवा मंडळाकडुन अन्नदान- मंडळाच्या स्तृत्य उपक्रमांचे सर्वत्र कौतुक*
*फोंडाघाट : प्रतिनिधि*
कणकवली तालुक्यातील नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) नवीन कुर्ली फोंडाघाट या मंडळाकडुन एक सामाजिक स्तृत्य उपक्रम राबविण्यात आला असुन स्वस्तिक फाउंडेशन दिविजा वृध्दाश्रम असलदे येथील अनाथ वयोवृद्धांना अन्नदान देवुन मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) नवीन कुर्ली, फोंडाघाट या मंडळाकडुन अन्नदान श्रेष्ठदान समजुन दिपावली दिवशी स्वस्तिक फाउंडेशन दिविजा वृद्धाश्रमातील वयोवृध्द आजी आजोबांना अन्नदान केले.
वृध्दाश्रमामध्ये अन्नदान देतेवेळी मंडळाचे अध्यक्ष अरुण पिळणकर, सचिव अतुल डवुर, खजिनदार अमित दळवी, प्रशांत दळवी, विजय आग्रे, प्रदीप आग्रे, सचिन साळसकर, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, उपाध्यक्ष सुरज तावडे, कृष्णा परब, सदाशिव राणे सर, बाळकृष्ण चव्हाण, आशिष पेडणेकर, शरद पवार, दिनेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, पांडुरंग चव्हाण, संजय मोहिते आदी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ऐन दिपावली दिवशी मंडळाच्या या स्तृत्य उपक्रमांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
नवदुर्गा युवा मंडळामार्फत यापुर्वी ही असे अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले असुन सामाजिक उपक्रम राबवुन गरजुना मदतीचा हात देणे हा मंडळाचा प्रमुख उद्देश आहे यावेळी दिविजा वृद्धाश्रम चे संदेश शेट्ये यांनी मंडळाचे आभार मानले. दिपावली दिवशी या अन्नदान कार्यक्रमावेळी वृध्दाश्रमातील आजी आजोबांच्या चेह-यांवर दिवाळी सणाचा व या अन्नदानाचा दुहेरी आनंद दिसत होता

