अमित साटम यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आर. के. फाउंडेशन’ व ‘कामगार मोर्चा सिंधुदुर्ग’ यांचा संयुक्त उपक्रम

अमित साटम यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आर. के. फाउंडेशन’ व ‘कामगार मोर्चा सिंधुदुर्ग’ यांचा संयुक्त उपक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*अमित साटम यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आर. के. फाउंडेशन’ व ‘कामगार मोर्चा सिंधुदुर्ग’ यांचा संयुक्त उपक्रम*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित साटम यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आर. के. फाउंडेशन’ व ‘कामगार मोर्चा सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने शिरगाव येथे बांधकाम कामगारांसाठी मोफत नावनोंदणी व नूतनीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला कामगारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात सुमारे १४० बांधकाम कामगारांनी नावनोंदणी आणि नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
या कार्यक्रमाच्या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम, शिरगावचे सरपंच समीर शिरगावकर, उपसरपंच संतोषकुमार फाटक, शिरगाव सोसायटीचे चेअरमन मंगेश लोके, विनायक साटम, कुवळे उपसरपंच सुहास राणे, दाजी राणे, महेश पाटोळे, वैभव साळसकर, पंकज दुखंडे, महेश मेस्त्री, प्रकाश सावंत, बंडू माने, सत्यवान सावंत, देवगड युथ फोरमचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर, शिरगांव पोलीस पाटील चंद्रशेखर साटम, शिरगांव ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, हितचिंतक, कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत, जिल्हाध्यक्ष अशोक राणे, सचिव रोहन गुरव, यतीन गावडे व संध्या गावडे, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!