भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत आरोग्य विषयक सेवाभावी उपक्रम

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत आरोग्य विषयक सेवाभावी उपक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत आरोग्य विषयक सेवाभावी उपक्रम*

*वेंगुर्ले तालुक्यातील चार आरोग्य केंद्र व दोन उपजिल्हा रुग्णालयात वाढदिवसानिमित्त रुग्ण साहित्य प्रदान करणार*

*बी.पी.मशीन , नेब्युलायझर , स्टेटेस्कोप , ऑक्सिमीटर , वेट मशीन , फेटल डाॅपलर मशीन इत्यादी अत्यावश्यक साहित्य भेट देणार*

*वेंगुर्ले : प्रतिनिधि*

भारतीय जनता पार्टीच्या ध्येयधोरणावर चालताना यावर्षी विशाल परब यांनी आपला वाढदिवस कोणत्याही धुमधडाक्याच्या कार्यक्रमात नव्हे, तर विविध समाजोपयोगी उपक्रमांमधून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे .

त्यामुळेच त्यांनी वेंगुर्ले तालुक्यातील आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय यामध्ये सर्व सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन वाढदिवसाच्या निमीत्ताने रुग्ण साहित्य प्रदान करणार आहेत . जेणेकरुन आरोग्य विषयक असलेल्या समस्या दुर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!