तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्यानिकेतनचे यश

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्यानिकेतनचे यश

*कोंकण एक्सप्रेस*

*तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्यानिकेतनचे यश*

*वेंगुर्ला प्रतिनिधी-प्रथमेष गुरव*
क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत वेंगुर्ला येथील सिधुदुर्ग विद्यानिकेतनच्या खेळाडूंनी यश प्राप्त केले.
यात १०० मी. धावणे प्रकारात सोहम सावंत प्रथम व आयुष नार्वेकर तृतीय, २०० मी. धावणे प्रकारात मिहिर राऊळ याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सोहम सावंत या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरूरकर, सचिव दत्तात्रय परूळेकर, मुख्याध्यापक मनिषा डिसोजा यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!