*कोंकण एक्सप्रेस*
*भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळच्या अध्यक्षपदी डॉ.आनंद बांदेकर*
*वेंगुर्ला प्रतिनिधी-प्रथमेष गुरव*
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ल्याची सभा १२ ऑक्टोबर रोजी मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी पुढील तीन वर्षांसाठी नविन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी डॉ.आनंद बांदेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष-अॅड.श्याम गोडकर व गजानन गोलतकर, सरचिटणीस-डॉ.जी.पी.धुरी, सहचिटणीस-श्रेया मयेकर, खजिनदार – सुरेश बोवलेकर तर सदस्य म्हणून रमण वायंगणकर, विकास वैद्य, दीपक कोचरेकर, भरत आवळे, रमेश नार्वेकर, सदानंद केरकर, श्रेया मांजरेकर, जयराम वायंगणकर राजेंद्र कांबळी यांचा तसेच प्रा.डॉ.सचिन परूळकर व आत्माराम सोकटे हे स्वीकृत सदस्य तर सल्लागार म्हणून गुरूनाथ कांबळी व भाऊ आंदुर्लेकर यांचा समावेश आहे.
या सभेत मावळते अध्यक्ष अॅड.श्याम गोडकर यांनी गेल्या तीन वर्षात मंडळाने राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. तर रा.कृ.पाटकर हायस्कूलचे मुख्याध्यापक आत्माराम सोकटे यांचा सेवानिवृत्तीपर तसेच नुतन अध्यक्ष डॉ.आनंद बांदेकर यांचाही सत्कार करण्यात आला. डॉ.जी.पी.धुरी यांनी आभार मानले.

