वेंगुर्ले येथे शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत संपन्न

वेंगुर्ले येथे शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ले येथे शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत संपन्न*

*वेंगुर्ले : प्रतिनिधि*

वेंगुर्ले पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी सदस्य पदांची आरक्षण सोडत आज तहसीलदार कार्यालय येथे जाहीर झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, तहसीलदार ओंकार ओतारी, नायब तहसीलदार राजन गवस आदींच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत संपन्न झाली. दरम्यान निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार या आरक्षण सोडत मध्ये जुन्या आरक्षणांचा विचार न केला गेल्याने सर्वच ठिकाणी नवीन आरक्षण जाहीर झाली यामुळे अनेक इच्छुकांची नाराजी झाली तर अनेकांना पुन्हा संधी चालून आली आहे.
आज जाहीर झालेल्या या आरक्षण मध्ये म्हापण, परुळे, आसोली व आडेली या पं स मतदार संघात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. वायंगणी, रेडी, शिरोडा, उभादांडा या पं स मतदार संघासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. तर तुळस मतदार संघासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व मातोंड मतदार संघासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग अशी आरक्षण जाहीर झाली आहेत. शाळकरी मुलांच्या हस्ते चिठ्या काढून आरक्षण जाहीर करण्यात आले.
या आरक्षण सोडतीवेळी भाजपा तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पप्पू परब, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, माजी पं स उपसभापती सिद्धेश परब, भाजपा तालुका चिटणीस समिर कुडाळकर, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, केळूस सरपंच योगेश शेटये, आरवली सरपंच समिर कांबळी, भाजपा चे शक्तीकेंद्र प्रमुख कमलेश गावडे, सुभाष सावंत, प्रसाद पाटकर, भूषण सारंग, सुधीर धुरी, मातोंड ग्रा प सदस्य विशाल बागायतकर, दिपेश परब, तुळस ग्रा प सदस्य जयवंत तुळसकर, सायमन आल्मेडा, वैभव होडावडेकर आदी उपस्थित होते.

जिल्हापरिषद साठी सर्वच जागा सर्वसाधारण
वेंगुर्ला तालुक्यात जिल्हा परिषद मतदार संघाचा विचार करता सर्वच जागांवर सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहेत. यात तुळस व म्हापण जिल्हापरिषद महिलांसाठी राखीव झाली आहे. यामुळे वेंगुर्ला तालुक्यात अनेक इच्छुक पाहायला मिळणार आहेत. तालुक्यात ५ जिल्हा परिषद मतदार संघातील तुळस व म्हापण मध्ये सर्वसाधारण महिला तर आडेली, रेडी, उभादांडा मतदार संघासाठी सर्वसाधरण आरक्षण जाहीर झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!