राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव कणकवली तालुकास्तरीय महोत्सवात कासार्डे विद्यालय अव्वल : जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव कणकवली तालुकास्तरीय महोत्सवात कासार्डे विद्यालय अव्वल : जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव कणकवली तालुकास्तरीय महोत्सवात कासार्डे विद्यालय अव्वल : जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले.*

कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे आयोजित करण्यात आलेल्या कणकवली तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव मध्ये कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्हायसर बॅक्टेरिया या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे या संघाची निवड कुडाळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय नाट्योत्सवासाठी झाली असून कणकवली तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या नाट्योत्सवाचे उद्घाटन कासार्डे विकास मंडळाच्या स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, स्पर्धेचे परीक्षक डी. व्ही. पन्हाळकर, एस. एस. पाटील, एस. सी. शेंगाळ, पंचायत समिती कणकवलीचे विषयातज्ञ सचिन तांबे, मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्हि. राणे तसेच, सहभागी संघ प्रतिनिधी उपस्थित होते.

हा नाट्यमहोत्सव कासार्डे विद्यालयाच्या सरस्वती गणपत बंड सभागृहात पार पडला. यामध्ये तालुक्यातील एकूण 4 शाळांनी सहभाग घेतला होता. यावर्षी मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असा विषय देण्यात आला होता. हा विज्ञान महोत्सव कोल्हापूर विभाग उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग, गटशिक्षणाधिकारी कार्यालय कणकवली आणि कासार्डे विकास मंडळ मुंबई संचालित कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

या महोत्सवात व्दितीय क्रमांक कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली (हरित तंत्रज्ञानाचे महत्व) तर तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यामंदिर कनेडी (मोबिया : द स्टार्ट ऑफ एंड) यांनी मिळविला. या विजेत्या संघांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे यांनी केले. तर संपूर्ण महोत्सव यशस्वी पार पडण्यासाठी विज्ञान प्रमुख सौ. एस. एम. जाधव, विज्ञान शिक्षक सौ. डी. डी. मिठबावकर, सौ. व्ही. व्ही. मुद्राळे, श्री. डी. डी. देवरुखकर, श्री. डी. एम. पवार, सौ. एस. एस. पेडणेकर, श्रीमती पी. वाय. सुतार, श्री. एस. एस. वाळके, श्री. एस. आर. पांचाळ सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. व्ही. राऊळ यांनी तर एस. व्ही. राणे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!