*कोकण Express*
*कणकवलीत मिनी लॉकडाऊनची कडकडीत अमलबजावणी*
*मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शहर आणि तालुक्यात आज मिनीलाब डाऊन कडकडीत बंद ठेवून पाळला जात आहे. दवाखाने आणि मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व दुकाने बंद आहेत. तसेच रस्ते देखील निर्मनुष्य झाले आहेत. तर विनाकारण बाजारात फिरणाऱ्याची हजेरी पोलिसांकडून घेतली जात आहे
महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन लावण्यात आले असून कणकवलीत तालुक्यासह शहरात शनिवारी पूर्णत: कडक लॉकडाउनची अंमलबजावणी पाहायला मिळाली. कोरोनाचे निर्बंध असल्याने शनिवारी सकाळच्या सत्रात संपूर्ण कणकवली निर्मनुष्य झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात अत्यावश्यक सेवा मध्ये असणारे फक्त मेडिकल दुकाने व दवाखाने याव्यतिरिक्त सर्वच आस्थापने बंद असल्याचे दिसले आहे. तसेच शहरांमध्ये पोलीस गस्त सुरू असून मुख्य चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पोलिस विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. तसेच पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाही होत आहे.