*कोकण Express*
*कणकवली पं.स. सभापती मनोज रावराणे व उपसभापती प्रकाश पारकर यांच्या स्वखर्चातून ४२ अंशकालीन स्त्री परीचर यांना एक समान रंगाच्या साड्यांचे वाटप!*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
खास.नारायण राणे यांच्या वाढदिवासनिमित्त पंचायत समिती कणकवलीचे सभापती मनोज रावराणे व उपसभापती प्रकाश पारकर यांच्या विद्यमानाने तथा संकल्पनेतून कणकवली गटातील स्थानीक पातळीवर तळागाळातील लोकांपर्यंत पोहचुन गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या अंशकालीन स्त्री परीचर यांना एक समान रंगाच्या साडयांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्षा सौ संजना सावंत , सभापती मनोज रावराणे उपसभापती प्रकाश पारकर , पं..स सदस्य मिलींद मेस्त्री , सुचीता दळवी , गटविकास अधिकारी अरूण चव्हाण , सहा.गटविकास अधिकारी अभिजीत हजारे आदी उपस्थीत होते .
या अंशकालीन स्त्री परीचर या दुर्लक्षीत राहीलेल्या असल्याने त्यांच्या मागण्याही पूढे शासन सदरी मांडणार असल्याचे जि.प.सिंधुदुर्ग अध्यक्ष सौ.संजना सावंत यांनी सांगीतले .तसेच त्यांच्या तुटपुंज्या वेतनाचाही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले . कोराणाच्या पाश्वभूमीवर संबंधित स्त्री परीचर यांनी स्थानीक पातळीवर कोणती कामे व खबरदारी घेण गरजेचे आहे हे देखील आरोगय यंत्रणेकडून सांगण्यात आले तसेच त्यांची जबाबदारी व घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले . तसेच अंशकालीन स्त्री परीचर देखील कोरानायोदधा म्हणूनच स्थानीक पातळीवर मोठया हिमतीने काम करीत असल्याने पूढेही या कोरानाच्या महामारीत त्यांनी पुन्हा एकदा अशाचप्रकारे काम करावे यासाठी प्रोत्साहन व त्यांचा सन्मान म्हणून साडयांचे वाटप करुन त्यांना याव्दारे गौरवीण्यात येत असल्याचे सभापती व उपसभापती यांनी सांगीतले.
नारायण राणे यांचे विचार घेवून यापूढेही समाजातील अशा उपेक्षीत घटकांसाठी काम करत रहाणार असल्याचेही सभापती म्हणाले.यावेळी अशंकालीन स्त्री परीचर यांना त्यांची ओळख असणारे ओळखपत्रही देण्यासाठी जि.प कडून प्रयत्न करणार असल्याचे तसेच अशाप्रकारचा ड्रेस कोड संपूर्ण जिल्हयासाठी करण्याचा मनोदय अध्यक्षा संजना सावंत यांनी व्यक्त केला.तसेच अशा अंशकालीन स्त्री परीचर यांचा सन्मा.सभापती यांनी केल्याबाबत त्यांचे खास अभिनंदही केले. अशाच प्रकारचे काम जिल्हयातील अन्य सर्व पंचायत समितीमधून झाले पाहीजे अशी अपेक्षाही व्यक्त केली.यावेळी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून साडयांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी तर आभार गटविकास अधिकारी अभिजीत हजारे यांनी मानले .