सन्माननीय श्री नीतेश जी राणे साहेब यांनी आज पर्यंत जे सामाजिक कार्य केले आहे ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीतच! अमित वेंगुर्लेकर

सन्माननीय श्री नीतेश जी राणे साहेब यांनी आज पर्यंत जे सामाजिक कार्य केले आहे ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीतच! अमित वेंगुर्लेकर

*कोंकण एक्सप्रेस*

*सन्माननीय श्री नीतेश जी राणे साहेब यांनी आज पर्यंत जे सामाजिक कार्य केले आहे ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीतच!
अमित वेंगुर्लेकर*

या पूर्वी आणि या नंतरही जनसामान्यांच्या उद्भवणाऱ्या न्याय हक्कासाठी जेव्हा शासकीय यंत्रणा नजरचुक करते,तेव्हाच सन्माननीय श्री नितेशजी राणे साहेब स्वतः उपस्थित राहून वेळोवेळी शासकीय प्रशासन अधिकाऱ्यांना आपली चूक पुराव्यासहित स्पष्ट करून जनसामान्यांना न्याय मिळवून देतात अशा वेळी त्याच्यावरही कायदेशीर कार्यवाही झालेली आहे परंतु निर्दोष मुक्तताही करण्यात आली असल्याने अशा प्रमाणिक सामाजिक कार्यकर्त्यांवर राजकारण घडवण्याचा प्रयत्न करत धार्मिक दंगली घडवणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशांतता पसरवणे असे वक्तव्य करण्याआधी आज पर्यंत सन्माननीय नीतेश जी राणे साहेब यांच्या अखत्यारीत घडलेल्या प्रत्येक पावलापावलावतिल घडामोडींची नोंद प्रसारमाध्यमांच्या द्वारे फक्त कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व्यक्त होत आहे याबाबत योग्य अभ्यास करावा तेव्हाच समजून येईल की आज पर्यंत अशाप्रकारच्या कोणत्याही वक्तव्याद्वारे धार्मिक अशांतता निर्माण होणे,किंवा जातीय दंगली घडवणे हे असे प्रकार घडलेले नाहीत.
परंतु सन्माननीय श्री नितेशजी राणे साहेबांच्या हिंदुत्ववादी भाषणातील शब्दशः अर्थ विरोधकना त्यांच्या चुकीच्या विचारशैली मुळे कळत नसावा,
आणि त्यामुळे राजकारण करत सामाजिक सुव्यवस्था नक्की कोण बिघडण्याचे काम करत आहे याचा विचार वेळीच विरोधकानीच करावा.म्हणजे हे कोणाचे दुर्भाग्य आहे हे हिंदुत्ववादी जनताच स्पष्ट समजून ठेवत आहे.
हिंदुत्व याचा अर्थ धार्मिक वाद नसून सर्व धर्मसंभाव आहे आणि याबाबतची परंपरागत शिकवण या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना ज्ञात आहे या मातीतून जन्म घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हिंदुत्ववादी विचारणा जन्मसिद्ध हक्क आहे तसेच गोमाता ही आपले हिंदुत्वाचे प्रतीक आहे पूर्ण महाराष्ट्र राज्यात गोहत्या बंदीचा कायदा हिंदुत्ववादी विचार जोपासण्याचे विचार जनसामान्याच्या वृद्धयात जागृत झाले आहेत त्यामुळे ही अशी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या नराधमाना पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींवरच धार्मिक अशांतता निर्माण करणे यासारखे गुन्हे दखल होणे गरजेचे आहे.
अशा असभ्य प्रकारांवर वेळीच आळा घालण्यात यावा या बाबत कट्टर हिंदुत्ववादी सन्माननीय श्री नीतेश जी राणे साहेब संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जनजागृती करत आहेत आणि असंख्य हिंदुत्ववादी जनतेचा सर्वधर्मीय सर्वतोपरी पाठिंबा त्यांच्या सोबत आहे या बाबतची दखल विरोधकांनी वेळीच घ्यावी या विषयावर चर्चा करण्याआधी प्रसारमाध्यमांद्वारे प्रकाशित असलेल्या सन्मानीय राणे साहेबांच्या हिंदुत्ववादी भाषणातील शब्दशः अर्थ समजून घ्यावा हे सर्व अभ्यास करण्यासाठी किमान काळाची गरज आहे कारण दिवसातून बरेच कार्यक्रम होत असतात आणि त्यामध्ये कायदा सुव्यवस्था याचा विचार करूनच हिंदुत्ववादी विचारांच्या चौकटीत राहून वक्तव्य करण्यात आले आहे याची विरोधकांनी नोंद घ्यावी लागेल.
हिंदुत्ववादी सन्माननीय श्री नीतेश जी नारायणराव राणे साहेब आपले सामाजिक कार्य असेच पुढे कार्यान्वित ठेवतील आणि जनतेचाही जसा १००% पाठिंबा आहे तसाच कायम राहील.
मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन तर्फे सन्माननीय श्री नीतेश जी नारायणराव राणे साहेब यांच्या कट्टर हिंदुत्ववादी सामाजिक कार्यास सर्वतोपरी पाठिंबा राहील असे प्रतिपादन प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकार माध्यमातून बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!