खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश मर्यादा वाढली, शिवसेना तालुकाप्रमुख श्री मंगेश गुरव यांच्या प्रयत्न यश*

खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश मर्यादा वाढली, शिवसेना तालुकाप्रमुख श्री मंगेश गुरव यांच्या प्रयत्न यश*

*कोंकण एक्सप्रेस*

*खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश मर्यादा वाढली, शिवसेना तालुकाप्रमुख श्री मंगेश गुरव यांच्या प्रयत्न यश*

*खारेपाटण (प्रतिनिधी)*

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या एस.एन.एम. विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या प्रवेशाची मर्यादा वाढवण्यासाठी कोल्हापूर शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे या भागात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. शिवसेना तालुकाप्रमुख श्री. मंगेश गुरव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे शिक्षण संस्थेने म्हटले आहे.
सध्या अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू असून, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची ख्याती दूरवर पसरली आहे. त्यामुळे कणकवली, राजापूर, वैभववाडी, तसेच देवगड तालुक्यांमधूनही विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यासाठी येत असतात. यावर्षी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिये मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दूर अंतरावरील कॉलेज मिळाल्याने ये -जा करणे सोयीचे नव्हते . तसेच आर्थिक भुर्दंड पालकांना बसत असले बाबत पालकांनी श्री मंगेश गुरव यांच्या निदर्शनास ही बाबत आणून दिली. वाढत्या विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे महाविद्यालयाने प्रवेश मर्यादा वाढवण्यासाठी कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावासाठी मंगेश गुरव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ कविता शिंपी मॅडम, अधिक्षक सौ . शलाका तांबे मॅडम व शिक्षण उपसंचालक श्री. चोथे साहेब यांच्यासोबत त्यांनी यासंदर्भात प्रत्यक्ष चर्चा केली. या चर्चेला यश आले असून, शिक्षण विभागाने प्रवेश मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, या भागात दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे.
या कामगिरीबद्दल खारेपाटण शिक्षण संस्थेच्या वतीने मंगेश गुरव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री संजय सानप सर, पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, यांनी मंगेश गुरव यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांच्यासोबतच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!