*माध्य. विद्यामंदिर साळशी प्रशालेस माजी विद्यार्थ्याकडून इले.वॉटर फिल्टर -प्रदान*

*माध्य. विद्यामंदिर साळशी प्रशालेस माजी विद्यार्थ्याकडून इले.वॉटर फिल्टर -प्रदान*

*कोंकण एक्सप्रेस*

*माध्य. विद्यामंदिर साळशी प्रशालेस माजी विद्यार्थ्याकडून इले.वॉटर फिल्टर -प्रदान*

*शिरगांव : संतोष साळसकर*

साळशी दि. 13 माध्य. विद्यामंदिर साळशी प्रशालेच्या एस.एस.सी.- मार्च- 2003 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्याकडून- प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याना शुद्ध पाणी मिळावे या उदात्त हेतूने व शाळेप्रती आपले ऋण व्यक्त करण्याच्या प्रांजळ हेतूने सुमारे दहा हजार पाचशे रुपये किंम तीचा इलेक्ट्रिक वॉटर फिल्टर भेट स्वरूपात प्रशालेचे मुख्या.श्री. माणिक वंजारे सर यांच्याकडे आज एका छोटे खानी कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आला.
या छोटीखानी कार्यक्रमास इ. 10 वी-मार्च- 2003 च्या बॅचमधील माजी विद्यार्थी,-निलेश लाड व रेश्मा मिराशी(धुळप) यांनी आपली मनोगत व्यक्त करताना शाळेप्रति आमचे ऋण थोड्याफार प्रमाणात फेडण्याचा प्रयत्न करतो आहोत, इथून पुढेही अशाच प्रकारे जे करता येईल ते आम्ही नक्की करू असे मार्गदर्शनपर आपले विचार व्यक्त केले.
SSC- मार्च 2003 च्या बॅच करून प्रशालेस इलेक्ट्रिक वॉटर फिल्टर प्रदान केल्याबद्दल प्रशालेचे मुख्या.श्री. माणिक वंजारे सर यांनी आभार मानून त्यांच्या या कार्याबद्दल कौतुकोउदगार काढले. या छोटी छोटी कामे करणारे मुलांनी जे दातृत्व दाखवले ते खूप महान असल्याचे मत व्यक्त केले.
सदरच्या कार्यक्रमास माजी विद्यार्थी,- निलेश लाड, रेश्मा मिराशी (धुळप), उमेश रावले, उमेश नाईक, सावंत हे तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस याच दहावीच्या मार्च- 2003 चा माजी विद्यार्थी -कै.श्री.किरण मेस्त्री (सरपंच- चाफेड) यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.
शेवटी आभार प्रदर्शन व खाऊवाटपा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील भरणकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!