एस. एम. प्रशालेच्या विद्यार्थिनींची जिल्हास्तर कला- उत्सवात चमक

एस. एम. प्रशालेच्या विद्यार्थिनींची जिल्हास्तर कला- उत्सवात चमक

*कोंकण एक्सप्रेस*

*एस. एम. प्रशालेच्या विद्यार्थिनींची जिल्हास्तर कला- उत्सवात चमक*

*कणकवली ः प्रतिनिधी*

येथील एस. एम. हायस्कूल, कणकवली या प्रशालच्या नववीच्या विद्यार्थ्यानी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात झालेल्या जिल्हास्तरीय कला-उत्सव स्पर्धेत चमकदार कामगिरी करत प्रशालेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मार्फत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कला – उत्सव नृत्य समूह स्पर्धा प्रकारामध्ये एस एम प्रशालेच्या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामध्ये तेजस्विनी देवलकर, दीपिका आंगणे,मनश्री लोहार,अस्मी तांबे या विद्यार्थिनींनी उत्तम कला सादर करत नेत्रदीपक यश मिळविले आहे. या नृत्य समूहाची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे.
यासाठी त्यांचे तसेच त्याला मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे कणकवली शिक्षण संस्था कणकवली चे कार्याध्यक्ष डॉ.एस. सी.सावंत ,सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष डॉ.एस.एन.तायशेटे,उपकार्याध्यक्ष एम.ए. काणेकर त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक जी.एन. बोडके, उपमुख्याध्यापक ,पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!