वळीवंडे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विष्णू सावंत यांची बिनविरोध निवड

वळीवंडे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विष्णू सावंत यांची बिनविरोध निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*वळीवंडे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विष्णू सावंत यांची बिनविरोध निवड*

*शिरगांव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील वळीवंडे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी विष्णू शांताराम सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे.
वळीवंडे ग्रामपंचायतीची ग्रामसभा ८ सप्टेंबर रोजी सरपंच नागेश वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विष्णू शांताराम सावंत यांची महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. विष्णू सावंत हे मुंबईस्थित सिंधुसागर विद्यामंदिर कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच वळीवंडे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे सचिव, हिरोजी विठोजी सावंत भोसले स्मारक मंडळ वळीवंडेचे अध्यक्ष, देवगड तालुका उद्धवसेनेचे ते उपतालुका प्रमुख आहेत. त्यांचा विविध सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असून, दादा सावंत या नावाने ते परिचित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!