*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचा “साशंकित” कारभार ?*
जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क लाभ देण्यास जिल्हा परिषद प्रशासनाकडून “टाळाटाळ” तर दुसरीकडे “बडतर्फ” कारवाईस तात्पुरत्या स्थगितीवर असलेल्या काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा घातला जातोय घाट..?
मुख्य कार्यकारी अधिकारी
सामान्य प्रशासन विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत कोणती. भूमिका घेणार…प्रसाद गावडेंचा सवाल
शासनाच्या लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्क लाभ देण्याची तरतूद असताना देखील सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाकडून मागील सहा ते सात महिन्यांपासून जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्क लाभानुसार नियुक्त्या जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद प्रशासन कोकण विभागीय आयुक्त,मंत्रालयीन ग्रामविकास विभाग व सामाजिक न्याय विभागाकडे अनावश्यक मार्गदर्शनपर पत्रव्यवहार करून जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या खऱ्या खुऱ्या वारसांना नियुक्त्या देण्यास जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी करत जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आहे. प्राप्त माहितीनुसार ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णयानुसार नियुक्त्या देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश असताना देखील सामान्य प्रशासन विभाग नेमक्या कोणत्या हेतूसाठी मार्गदर्शनपर पत्रांचा घाट घालत आहे असा सवाल गावडेंनी उपस्थित करत मागील सात ते आठ महिने जिल्हा परिषदेचे हुंबरे झीजवणाऱ्या सफाई कामगारांच्या वारसांच्या मनात “भीक नको पण कुत्रे आवर” अशी भावना होऊन ते व्यथित झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकीकडे जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या खऱ्या वारसांना वारसा हक्क लाभासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार याचना करावी लागत असताना दुसरीकडे मात्र याआधी विभागीय आयुक्त स्तरावरिल चौकशी प्रक्रियेत अनियमितता आढळून चुकीच्या नियुक्त्या सिद्ध झालेल्या प्रकरणांमधील बडतर्फ कारवाईस “तात्पुरत्या स्थगितीवर” असलेल्या वित्त विभागाकडील कर्मचाऱ्यांना मात्र नियमबाह्य पदोन्नती बहाल करण्याचा घाट सामान्य प्रशासन विभागाकडून घातला जात असल्याचा सनसनाटी आरोप गावडेंनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. प्राप्त माहितीनुसार ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णयानुसार नियुक्त्या देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश असताना देखील सामान्य प्रशासन विभाग नेमका कोणता हेतू डोळ्यांसमोर ठेवून मार्गदर्शनपर पत्रांचा घाट घालत आहे असा सवाल गावडेंनी उपस्थित करत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कारभारावर भले मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.एकीकडे जिल्ह्यातील मूळ रहिवासी सफाई कामगारांच्या खऱ्या खुऱ्या वारसांना वारसा लाभासाठी महिनोंमहिने जिल्हा परिषदेचे उंबरे झिजवावे लागतात दुसरीकडे मात्र बोगस “वारसांना” पदोन्नत्या देण्याचा घाट घालण्यामागे अर्थपूर्ण व्यवहार असल्याचा आरोप गावडे यांनी केला आहे. एरव्ही जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळ व सेवा शिस्तीचे धडे देणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या या अनागोंदी कारभाराबाबत कोणती भूमिका घेणार याची उलट सुलट चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे. शासन निकषात बसत नसताना देखील तात्पुरत्या स्थगितीवर असलेल्या त्या कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या देण्याचा घाट घालणारे पडद्यामागील चेहरे मुख्य कार्यकारी अधिकारी डोळसपणे पाहणार आहेत का असा सवाल गावडेंनी केला असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराबाबत लवकरच ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेऊन लक्ष वेधणार असल्याची माहिती प्रसाद गावडेंनी प्रसिद्धीस दिली आहे दिली आहे.

