*पत्नीच्या खून प्रकरणी ज्ञानेश्वर पेडणेकर निर्दोष मुक्त अॅड. कौस्तुभ मराठे यांचा यशस्वी युक्तीवाद*

*पत्नीच्या खून प्रकरणी ज्ञानेश्वर पेडणेकर निर्दोष मुक्त अॅड. कौस्तुभ मराठे यांचा यशस्वी युक्तीवाद*

*कोंकण एक्सप्रेस*

*पत्नीच्या खून प्रकरणी ज्ञानेश्वर पेडणेकर निर्दोष मुक्त अॅड. कौस्तुभ मराठे यांचा यशस्वी युक्तीवाद*

*प्रशांत वाडेकर : देवगड*

इारेबांबर काजूळवाडी, ता. दोडामार्ग येथे सार्वजनिक बोअरवेल वर भरदिवसा स्वतःच्या पत्नीवर पोटावर आणि डोक्यावर वार करुन तिचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती ज्ञानेश्वर देवू पेडणेकर याची सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश श्री. एच. बी. गायकवाड यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. याकामी संशयित आरोपीतर्फे अॅड. कौस्तुभ मराठे देवगड यांनी यशस्वी युक्तीवाद केला.

दि. ०५/०८/२०१९ रोजी दोडामार्ग झरेबांबर काजूळवाडी येथील सार्वजनिक बोअरवेलवर ज्ञानेश्वर पेडणेकर याने सकाळी ८.३० चे सुमारास स्वतःच्या पत्नीचे पोटावर आणि डोक्यावर चाकूने एकूण ४ वार करुन तिचा निघृण खून केला होता. खूनानंतर तात्काळ घटनास्थळावरुन पलायन करताना ज्ञानेश्वर पेडणेकर याला वाडीतील लोकांनी हत्यारासह पकडून पोलीसांचे स्वाधीन केले होते. याप्रकरणी पती पेडणेकर याचेविरुध्द त्याच्या सख्ख्या मुलाने खूनाची फिर्याद दोडामार्ग पोलीस स्टेशन मध्ये दिली होती. जिल्हा सत्र न्यायालयात पतीविरुध्द भा.दं. वि. कलम ३०२, शस्त्र अधिनियम कलम ४, २५ अंतर्गत खूनाचा खटला मागील ७ वर्षे सुरु होता. सरकार पक्षाने एकूण ८ साक्षीदार तपासले होते. ज्यामध्ये प्रत्यक्षदर्शी व खूनानंतर आरोपीला पकडणारे साक्षीदार सामील होते. दरम्यान साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, वैद्यकीय पुराव्यातील तफावती, उद्देश शाबित न होणे या सर्व बाबी आरोपीचे वकीलांनी न्यायालयासमोर मांडल्या होत्या. आरोपीच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राहभधरुन जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!