*कोंकण एक्सप्रेस*
*फणसे गावचे मुंबई स्थित शिवप्रतिष्ठान संस्थेचा समाज प्रबोधनात्मक उपक्रम*
*शिरगांव | संतोष साळसकर*
शिवप्रतिष्ठान मुंबई फणसे गावचे होतकरू आणि कर्तव्यदक्ष तरुण यांनी मुंबई महानगरात चरितार्थासाठी फणसे गाव सोडून मुंबईत स्थिर झाले बालपणापासून गरीबीला ठक्कर देत फणसे गावात आपले शालेय शिक्षण पूर्ण करून मुंबईत नोकरी निमित्त स्थिर होऊन सामाजिक विकासासाठी गावचे ऋण फेडण्यासाठी सर्व तरुण एकत्र आले आणि शिवप्रतिष्ठान ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थितीने दबलेल्या पिचलेल्या गरिबीमुळे होरपळून निघालेल्या लोकांच्या विकासासाठी सदैव उभी असते शिवप्रतिष्ठानचे हे सर्वच तरुण नव चैतन्याने भारलेले आहे समाज प्रबोधनाचे व्रत घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शैक्षणिक दर्जा अजून उंचावा यासाठी जिल्ह्याला नवप्रवाहात आणण्यासाठी शिवप्रतिष्ठनने आपल्या समाजसेवेच्या कुवतीनुसार कंबर कसलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून कुवळे गावातील गरीब आणि होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दप्तर ‘ वह्या ‘ पेना चित्रकलेचे साहित्य वॉटर बॅग असे साहित्य कुवळ्यातील ऐंशी विद्यार्थ्यांना देऊन उपकृत केले शिव प्रतिष्ठानचे हे महान असे कार्य आहे या महत्वपूर्ण कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री महेश दांडेकर साहेब व सर्व पदाधिकारी कुवळेगावचे सरपंच श्री सुभाष कदम प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी सर्व ग्रामस्थ व पालक उपस्थित होते
या उपक्रमासाठी श्री अनिल लाड व संतोष मालणकर यांनी शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून हा सोहळा कुवळे गावात घडवून आणला . आणि शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी योगदान दिले .