*कोंकण एक्सप्रेस*
*महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त नमिताताई गावकर यांचा मालवण भाजपाच्या वतीने सत्कार…*
*शिरगाव | संतोष साळसकर*
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मालवण भाजप च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन समाजकार्य करणाऱ्या व महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त नमिताताई गावकर यांचा सत्कार भाजपा मालवण तालुका कार्यालयात तालुका अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांच्या मार्फत करण्यात आला.
नमिता ताई गावकर हे गेली 25 वर्षे विविध सामाजिक उपक्रमामध्ये कला क्षेत्र पर्यटन व्यवसाय क्षेत्रात सहभागी होऊन उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य सरकाने त्यांना पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सामाजिक काम करत असताना महीलांना रोजगार उपलब्ध होऊन, महीला स्वताच्या पायावर उभ्या राहील्या पाहिजेत या उदात्त हेतुने कार्य करत असून अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या मानवतेच्या कामाचे अनुकरण करत कार्य करत असल्याने अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून भाजप च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी बोलताना नमिताताई गावकर म्हणाल्या कि एक अद्वितीय राजकारण धुरंधर व कर्तृत्ववान राज्यकर्ता या नात्याने अहिल्यादेवींकडे पहाताना त्यांचे स्त्रीत्व हे त्यांच्या सामर्थ्यात भर घालताना दिसते. अत्यंत दुर्मिळ अशी संवेदनशील, सर्वसामावेश, सर्वकश अशी दृष्टी त्यांच्या सर्व निर्णयात पहायला मिळते. नेतृत्व, कर्तुत्व, दातृत्व अन मातृत्व या चारही विषयात अहिल्यादेवी अलौकिक ठरल्या. अहिल्यादेवी ह्या एक शुद्ध मनाची, सात्विक विचारांची आदर्श राज्यकर्ती होती.
या सत्कार प्रसंगी बाबा मोंडकर तालुकाध्यक्ष, सुदेश आचरेकर माजी नगराध्यक्ष मालवण, बाबा परब सिंधुदुर्ग बँक संचालक, अशोक तोडणकर माजी नगराध्यक्ष पंकज सादये सरचिटणीस मालवण शहर भाजपा ललित चव्हाण युवा मोर्चा मालवण शहर अध्यक्ष,आबा हडकर दाजी सावजी, देवानंद लोकेगावकर, राजू आंबेरकर, नमिता गावकर, मिलिंद झाड, दिलीप सांगवेकर, अन्य भाजपा कार्यकतें उपस्थित होते.