*कोंकण एक्सप्रेस*
*खेलो इंडिया सागरी जलतरण स्पर्धेत पूर्वा गावडेला रौप्य पदक….*
*सिंधुदुर्गनगरी*
दिव येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया सागरी जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गची कन्या पूर्वा संदीप गावडे हिने रौप्य पदक पटकावले. तिने दिव समुद्रात १० किलोमीटरचे अंतर २ तास ३३ मिनिटात पार करत तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ मेडल पटकावले आहे. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील पूर्वा गावडे सध्या पुणे बालेवाडी येथे प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचे प्रशिक्षण घेत आहे. खेलो इंडियामध्ये सागरी जलतरण स्पर्धेत १० व ५ किलोमीटर स्पर्धेसाठी निवड झाली. त्यानंतर आज दिव येथील समुद्रात झालेल्या १० किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत समुद्रात १० किलोमीटरचे अंतर २ तास ३३ मिनिटात पार करत तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ मेडल पटकावले आहे. उद्या ती ५ किलोमीटर साठी सुद्धा समुद्रात उतरणार आहे. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय जलतरण संघटनेचे सेक्रेटरी राजू पालकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पूर्वीच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावाचे प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांनी खास अभिनंदन केले आहे.