*कोंकण एक्सप्रेस*
*तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पदावर नियुक्त आहात फोन व्यस्त ठेवा
अमित वेंगुर्लेकर !!!!!!*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
तसं कोणी कार्यालयात आलाच तर शासकीय मदत घेऊ. अधिकारी बिनधास्त कोणाच्या मर्जीवर? सर्वसामान्य नागरिकाना महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा कर्मचारी मंडळाने जैसे थे? भूमिका असल्याचं आज दाखवून दिलं आहे.लोकप्रतिनिधी येतील आपलं गाऱ्हाण मांडतील ,मिडिया बातमी करेल मग उद्या कोण विचारतय❓
असा समज महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा विभागाने आपल्या कार्यकारी अभियांत्रिकाना समजावून ठेवल्याचे माहिती पूर्वक पाठपुरावे समोर येत आहेत. जेव्हा विद्युत पुरवठा खंडित होतो तेव्हा तक्रार दाखल करण्याकरिता दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर फोन केला आता एक तर तो व्यस्त असतो अथवा अरेरावीची उत्तरे असतात मग मात्र सर्व सेवानी उपयुक्त सावंतवाडी शहरात अशा घोटाळेबाज विद्युत पुरवठा प्रवाहावरच बेजबाबदार कारभाराच बेभरोशी प्रशासन दिवसातून कित्येक वेळा वीज पुरवठा खंडित करून आपला मनमानी कारभार करत असल्याचे स्पष्ट होत आहे या बाबत अनेक वेळा बातमी द्वारे तसेच संबंधित जबाबदार अधिकारी यांना भेटून विनंती करून अद्याप पर्यंत सावंतवाडी तालुक्यातील तसेच गावागावातून निर्माण होणारे महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा विभागाचे मनमानीचे अनधिकृत विद्युत पुरवठा खंडित करण्याचे किंवा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रश्न मार्गी लागत नसल्याचे प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
याबाबत सबंधित जबाबदार अधिकारी व खाजगी कर्मचारी व्यवस्थापन यांना सर्वंमान्य जनतेला तातडीची सुखसुविधा देण्यात टाळाटाळ होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे याबाबत सबंधित जबाबदार प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन तर्फे प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकार माध्यमातून केली आहे तसेच या बाबत योग्य निर्णय सर्वसामान्य जनतेला पाठ पुराव्यासहित जनमाहिती अधीकारात बातमीद्वारे प्रसारित करावा अन्यथा दिनांक ०१/०७/२०२५ रोजी मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन तर्फे सावंतवाडी येथील विद्युत पुरवठा विभाग येथे सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आवश्यक मागण्याच्या पूर्ततेसाठी लाक्षणिक आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे श्री अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकार माध्यमातून स्पष्ट केले होते आणि ही चळवळ आपला न्याय हक्क मिळवणारच या बाबत शंका नाही याची नोंद संबंधित प्रशासनाने वेळीच घ्यावी अशी चेतावणी मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन सिंधुदुर्ग जिल्हा तर्फे लेखी नियोजनावरून संबंधित शासकीय प्रशासनास तातडीने नियोजनीय करत आहोत याची नोंद संबंधित विद्युत पुरवठा विभागाने घ्यावी .