युवकांनी संविधानिक समाज घडविण्याचा प्रयत्न करावा; स्वाती पारकर*

युवकांनी संविधानिक समाज घडविण्याचा प्रयत्न करावा; स्वाती पारकर*

*कोंकण एक्सप्रेस*

*युवकांनी संविधानिक समाज घडविण्याचा प्रयत्न करावा; स्वाती पारकर*

*अनुभव शिक्षा केंद्र आयोजित युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्सचे बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे आयोजन*

*सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)*

अनुभव शिक्षा केंद्र आयोजित मुंबई कोकण विभागीय युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स दि. 17 मे ते 26 मे या कालावधीत बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे संपन्न होत आहे. या शिबिराचे उद्घाटन शनिवार दि. 17 मे 2025 रोजी स्वाती पारकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सेवांगणचे व्यवस्थापक संजय आचरेकर, अनुभव शिक्षा केंद्र राज्य समन्वयक सचिन नाचणेकर, विभागीय समन्वयक आसमा, जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, दरक्षा, विशाल गुरव आदी उपस्थित होते.

या उद्घाटन प्रसंगी स्वाती पारकर यांनी व्यक्त होताना, आपली सामाजिक भूमिका कशाप्रकारे असावी याबाबत युवकांनी जागरूक असणे आवश्यक आहे. संविधानिक मूल्ये शिकत असताना ती स्वत: जगणे, अंमलात आणणे गरजेचे आहे. तरुणांनी सामाजिक अथवा राजकीय क्षेत्रात नेतृत्व निर्माण करून संविधानिक समाज घडविण्याचा प्रयत्न करावा, असे मत व्यक्त केले. सचिन नाचणेकर यांनी युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स संकल्पना आणि युवकांसाठी त्याची गरज का आहे हे स्पष्ट केले. श्री. आचरेकर यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये ‘आप डॉक्टर, टीचर कुछ भी बनो पर पहले इन्सान बनो’ असा उपदेश केला.

युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्समध्ये नेतृत्व गुण, संभाषण कौशल्य, संविधान, लिंग समानता, प्रशासकीय यंत्रणा, माहितीचा अधिकार याबाबतचे तज्ञ व्यक्तींसोबत संवाद सत्राचे आयोजन केले आहे. सोबतच याच विषयांना घेऊन अभ्यास दौऱ्याचे नियोजन आहे. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साथी विशाल गुरव तर आभार साथी आसमा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!