राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव भाजपाच्या वतीने साजरा होणार

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव भाजपाच्या वतीने साजरा होणार

*कोंकण एक्सप्रेस*

*राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव भाजपाच्या वतीने साजरा होणार* .

*प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई*

*जिल्हा संयोजक – राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी कार्यक्रम* .

*बुधवार दिनांक २१ मे रोजी भाजपा सिंधुदुर्ग ची त्रिशताब्दी जयंती उस्तव आयोजन करण्यासंदर्भात ” जिल्हा कार्यशाळा “*

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव संपुर्ण महाराष्ट्रात २१ मे ते ३१ मे या कालावधीत साजरा केला जाणार आहे . या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासंदर्भात *भाजपा सिंधुदुर्ग ची ” जिल्हा कार्यशाळा ” बुधवार दिनांक २१ मे रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग नगरी येथील वसंत स्मृती सभागृहात महीला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा व ठाणे – कोकण विभागाच्या अभियानाच्या प्रमुख प्रा.वर्षा भोसले – माने* यांच्या प्रमुख उपस्थितीत संपंन्न होणार आहे .
या कार्यशाळेसाठी भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी , प्रदेश कार्यकारणी सदस्य , मोर्चा / आघाडी प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारणी सदस्य , जिल्हा पदाधिकारी , जिल्हा व मंडल समिती ( राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंती समारोह ) , जिल्हा मोर्चा अध्यक्ष व सरचिटनीस , आघाडी / प्रकोष्ठ जिल्हा संयोजक , मंडल अध्यक्ष ( आजी / माजी ) , सर्व लोकप्रतिनिधी अपेक्षीत आहेत . तरी सर्व अपेक्षीतांनी उपस्थित रहाणे अनिवार्य आहे .
सिंथुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेशजी राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उस्तव विवीध उपक्रम आयोजीत करुन साजरा करणार असे या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सांगीतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!