*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयत मंगळवार दि. 20 रोजी विविध शासकीय दाखले शिबीर*
*फोंडाघाट ः संजना हळदिवे*
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित, कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट व तहसील कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने फोंडाघाट पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचे विविध शासकीय दाखले काढण्यासाठीचे शिबिर मंगळवार दिनांक 20/05/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे.
फोंडाघाट पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी आपले शासकीय दाखले काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह *मंगळवार दिनांक 20/05/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट.* येथे आपल्या पालकांसह उपस्थित रहावे. असे आव्हान मा. डॉ. पुरंधर नारे प्राचार्य यांनी केले आहे.