*कोंकण एक्सप्रेस*
*देवी भगवतीची डाळपस्वारी भक्तीमय वातावरणात*
*मुंबईकर चाकरमनी आणि जिल्हाभरातील हजारो भाविकांची उपस्थिती*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
येथील देवी भगवतीची डाळपस्वारी उत्साहात व भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये वाडीवाडीमध्ये देवीचे आणि भाविकाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.तीन वर्षाची मर्याद पुर्ण. डाळपस्वारीस गुरुवार दि ८ मे पासून सुरूवात झाली होती.
देवी भगवतीचा त्रैयवार्षिक डाळपस्वारी सोहळा गुरूवार ८ मे पासून ते ११ मे सुरू होता. तीन दिवस गावामध्ये मुक्काम करून चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी रात्री १२ वाजता देवी भगवती रयतेच्या लवाजम्यासह मंदिरात आली.देवी भगवती मंदिरामध्ये सर्व देवस्थळाला भेट देवून देव स्थिर झाले. हा अलौकिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील गावातील ग्रामंस्थानी जानेवारी महिण्यापासूनच रेल्वे तिकीटी, एसटीच्या तिकिटी यांचे आरक्षण करून ठेवले होते. हजारो मुंबईकर ग्रामंस्थ या डाळपस्वारी सोहळ्याला उपस्थित होते. गुरूवार दि ८ मे रोजी दुपारी ४ वाजता देवी भगवतीने ग्रामंस्थ व भाविकांसह डाळपस्वारीस भगवती मंदिरातून सुरूवात केली. ती बांबरवाडी येथील देव पाटील मंदिर येथे पहिले प्रस्थान केले. तेथून बांबरवाडी येथील देवी बायची मंदिर येथे आगमन व रात्री मुक्काम ता.९ रोजी सकाळी देवी बायची ची अभिषेक पुजा व नैवेद्य त्यानंतर सकाळी १०-३० वाजता देवी बायचीस डाळपस्वारीस पुढे जाण्यासाठी कौलप्रसाद लावण्यात आला लगेचच देवीने पुढे जाण्यासाठी कौलप्रसाद दिला. दुपारी दोन वाजता देवीचे कारीवणेवाडी येथील श्री ब्राह्मण मंदिराकडे प्रस्थान ब्राह्मण देवाची भेट देऊन आडबंदर वाडी येथे चव्हाटा मंदिर येथे प्रस्थान आडबंदर येथील देव चव्हाटा ची भेट घेऊन आपईवाडी येथे प्रस्थान आपईवाडी येथील देव विठोबाची भेट घेऊन रात्री विठोबा मंदिर येथे मुक्काम तिसऱ्या दिवशी ता.१० सकाळी देव विठोबाची अभिषेक पुजा व नैवद्य झाल्यानंतर दुपारी अडीज वाजता आडवळवाडी येथील ब्राह्मण देव मंदिर येथे आगमन ब्राह्मण देवाची भेट घेऊन भंडारवाडी येथील देव जळबांधा ची भेट तेथून भंडारवाडी मार्गे सडेवाडी येथे प्रस्थान झाले.
सडेवाडी येथे सिमासाध्य करून सडेवाडी मंदिरास भेट तेथून रात्री अकरा वाजता भंडारवाडी कडे प्रस्थान भंडारवाडी येथील देव कांबरदेव मंदिराकडे प्रस्थान कांबरदेव ची भेट व रात्री मुक्काम चौथ्या दिवशी ता.११ रोजी सकाळी कांबरदेवची अभिषेक पुजा व नैवेद्य करून दुपारी दोन वाजता लब्देवाडी येथे प्रस्थान लब्देवाडी येथील देव जांभळकी येथे आगमन व भेट तेथून झरीवाडी येथे प्रस्थान झरीवाडी येथून सावंतवाडी मोऊळ, सावंतवाडी मोऊळ येथून सावंतवाडी येथील देव भराडीस भेट,तेथून तेलीवाडी, हरिजनवाडी, आईरवाडी, देऊळवाडी येथून देवी भगवती मंदिरामध्ये रात्री बारा वाजता आगमन झाले. गेल्या चार दिवसा मध्ये देवीचे आगमन होत असे त्या ठिकाणी वाडीवाडीमध्ये देवीची ओटी भरणे देवीस तळी देणे नवस बोलने, नवस फेडने त्याचप्रमाणे देवीच्या (तरंग) अवसरांजवळ भक्त आपल्या विनंती सांगत असत देवीचे अवसर अडचणीत असलेल्या भक्ताना मार्ग सांगत होते.