*कोंकण एक्सप्रेस*
*कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठाचा बुधवारपासून वर्धापन दिन सोहळा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
प्रेमदया प्रतिष्ठान, मुंबईच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या कळसुली-हर्डी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन सोहळा बुधवार 14 व गुरुवार 15 मे रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
बुधवार 14 मे रोजी पहाटे 5.30 वा. नित्यपूजा, सकाळी 6.00 वा. पुण्याहवाचन, सकाळी 6.45 वा. अभिषेक, पूर्वपूजा, सकाळी 7 वा. महारुद्र अभिषेक, दुपारी 12.30 वा. उत्तरांग पूजा, दुपारी 1.00 वा. नामस्मरण, महाआरती, नैवेद्य, तिर्थप्रसाद, दुपारी 3 वा. ग्रंथवाचन, सायंकाळी 5 वा. लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी 7 वा. स्थानिक भजने. गुरुवार 15 मे रोजी पहाटे 4.30 वा. काकड आरती, 5.30 नित्यपूजा, सकाळी 6.30 वा. पूर्वांग पूजा, सकाळी 7 वा. महारुद्र अभिषेक, दुपारी 12.30 वा. उत्तरांग पूजा, दुपारी 1 वा. महाआरती, दुपारी 1.30 वा. ते 3.00 वा. महाप्रसाद, सायंकाळी 4 वा.ग्रंथवाचन, सायंकाळी 5.30 वा. पालखी मिरवणूक, सायंकाळी 7 वा. महाआरती, सायंकाळी 7 वा स्थानिक भजने, रात्री 10 वा. श्री बोर्डेकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग यांचा ‘अंग विरहीत स्त्री’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ कळसुली च्यावतीने प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी केली आहे.