*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची जय्यत तयारी….*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने कणकवली टेंबवाडी येथे अभय राणे मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय पुरुष महिला निमंत्रित कबड्डी स्पर्धेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली त्या संदर्भात बोलविलेल्या बैठकीस सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे कार्यवाह श्री दिनेश चव्हाण,मंडळाचे आश्रयदाते श्री अभय राणे,,स्पर्धा संयोजक मंडळाचे सर्वेसर्वा सागर राणे ,, अध्यक्ष ओंकार राणे, उपाध्यक्ष व्यंकटेश सावंत, अमिता राणे, ललित राणे , निखिल बागवे ,रुपेश साळुंखे ,रोहण चव्हाण मंडळाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते . बैठकीत स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सामन्यांची गटवारी वेळेचे नियोजन , खेळाडू व पंच निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था ,भोजन व्यवस्था ,वैद्यकीय सुविधा,चेंजिंग रूम,पाणी व्यवस्था,सुरक्षा व्यवस्था आधी बाबींवर चर्चा झाली .स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल श्री दिनेश चव्हाण यांनी उपस्थित अभय राणे मित्रमंडळाचे कौतुक केले व आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले . सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील नामांकित मंडळाचे पुरुष १२ संघ व महिला १२ संघ सहभागी होत आहेत .या संघामध्ये राष्ट्रीय स्तरावर व प्रो कबड्डी स्पर्धेत खेळणारे नामांकित प्रतिनिधित्व करत आहेत .कणकवली येथे प्रथमच पुरुष व महिला राज्यस्तरावरील भव्य दिव्य स्पर्धा होत असल्याने कबड्डी चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे .उद्या दिनांक १ मे ते ३ मे या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी आज संध्याकाळपासूनच राज्यभरातून संघ कणकवली मध्ये दाखल होणार आहेत .उद्या १ मे रोजी सायंकाळी ४ वाजता महिला गटातील स्पर्धेचे उद्घाटन होणार असून साखळी व बाद फेरीतील सामने होणार आहेत .तर पुरुष गटाचे सामने २ मे रोजी सायंकाळी ४ वाजता सुरू होणार आहेत .खेळाडूंसाठी उत्तम मातीचे मैदान बनविले असून मैदानाभोवती प्रेक्षकांसाठी
सुसज्ज व भव्य दिव्य गॅलरीची व्यवस्था व प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे .