*कोंकण एक्सप्रेस*
*शिक्षक भारती कणकवली तालुका महिला आघाडी प्रमुखपदी कणकवलीच्या श्रीम. विद्या शिरसाट तर कार्यवाहपदी खारेपाटणच्या प्रियेशा अमृते*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
शिक्षक भारतीय सिंधुदुर्ग शाखा कणकवलीची महिला आघाडीची कार्यकारिणी नुकतीच राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर,जिल्हा अध्यक्ष प्रशांत आडेलकर यांच्या उपस्थितीत जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुश्मिता चव्हाण यांनी जाहीर केली असून
कणकवली तालुका शिक्षक भारती महिला आघाडी प्रमुख कणकवली विद्यामंदिरच्या शिक्षिका श्रीम- विद्या शिरसाट यांची तर खारेपाटण शेठ न.म.विद्यालयाच्या शिक्षिका श्रीम.प्रियेशा अमृते यांची कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे
याप्रसंगी जिल्हा सिंधुदुर्ग शिक्षक भारती पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली तालुका शिक्षक भारती महिला आघाडी पुढीलप्रमाणे-
आघाडी प्रमुख-श्रीम. विद्या हेमंत शिरसाट(विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली),कार्याध्यक्ष-श्रीम. प्रणिता उल्हास बांबुळकर(माध्यमिक विद्यालय नाटळ),कार्यवाह-श्रीम. प्रियेशा प्रवीण अमृते(शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण),श्रीम. वैशाली अभिषेक मांगले(बॅ. नाथ पै प्रबोधिनी, करूळ),
खजिनदार- श्रीम. सायली सुनिल पवार(फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूल), उपाध्यक्षा – श्रीम. सविता मुकूंद जाधव(कासार्डे, माध्यमिक विद्यालय, कासार्डे),श्रीम. स्नेहल सुनिल तांबे(अ. वि. फडणवीस माध्यमिक विद्यामंदिर, घोणसरी),,संघटक-श्रीम. अस्मिता आनंद मोरजकर(बॅ. नाथ पै प्रबोधिनी, करूळ),सहसंघटक-श्रीम. चैत्रा चंद्रकांत चव्हाण(कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली),संपर्क प्रमुख-श्रीम. आदिमाया शिवराम सावंत(माध्यमिक विद्यालय, बीडवाडी)
सदस्य म्हणून श्रीम. प्राजक्ता दयानंद कोकाटे(शेठ न. म.विद्यालय खारेपाटण),
श्रीम. धनलक्ष्मी चंद्रकांत तळेकर (वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय, तळेरे),श्रीम. आशा संजय भोर(शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण),श्रीम. सारिका सचिन महिंद्रे(शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण),श्रीम. श्रावणी श्रीधर मोरये
(सरस्वती हायस्कूल, नांदगाव)
श्रीम. रसिका राजेंद्र कदम (विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली)तसेच जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्रीम. शर्मिला मिलिंद केळूसकर(विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय, कणकवली) यांची निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित महिला आघाडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.