*कोंकण एक्सप्रेस*
*सावंतवाडी रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ म्हणून अजिंक्य वराडकर यांची नियुक्ती…*
*आ.दीपक केसरकरांकडून पाठपुरावा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील उपजिल्हा रुग्णालयकत अस्थिरोग तज्ञ म्हणून डॉ. अजिंक्य वराडकर तर जिल्हा रुग्णालयात पॅथॉलॉजी म्हणून डॉ. प्रेरणा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार दीपक केसरकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे आरोग्यमंत्र्यांकडून याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. तसेच संबंधित डॉक्टरांनी तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर व्हावे, अशा त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती युवासेनेचे शहरप्रमुख प्रतीक बांदेकर यांनी दिली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात यावीत, असे आंदोलन स्थानिक संघटनांकडून करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ही पदे भरण्यात आली आहेत. लवकरच अन्य पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.