*कोंकण एक्सप्रेस*
*रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन आयोजित गावो गावी जाऊन महिलांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण सुरु करणार*
*सिंधुदुर्ग*
मार्गदर्शक मा.ना.श्री. रामदासजी आठवले, केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, भारत सरकार
सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्ग अंतर्गत दिवंगत हौसाआई बंडू आठवले, सकुताई आठवले महिला रोजगार संघ वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचतगट व इतर महिलांकरीता सिंधुदुर्गातील महिला आर्थिक बाबतीत सक्षम होण्याकरीता गावो गावी जाऊन महिलांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण सुरु करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणामुळे स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची संधी आपणास मिळणार आहे. त्यासाठी लागणारे उपकरणे आपणास संस्थेमार्फत पुरविण्यात येतील. व शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तरी इच्छुकांनी आपली नोंदणी करावी.
संपर्क श्री. रतनभाऊ कदम (खोटलेकर) संस्थापक अध्यक्ष, आरपीआय नेते (आठवले) मो. ८८७९२३६९७४