*कोंकण एक्सप्रेस*
*पडेल ग्रामपंचायतीचा स्व. आप्पा साहेब खेडकर पुरस्काराने सन्मान*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
देवगड तालुक्यातील पडेल ग्रामपंचायतीला पंचायत राज दिवस २४ एप्रिल’ राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान सन २०२५- २६ अंतर्गत स्व आप्पा साहेब खेडकर पुरस्काराने मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर व उप मुख्यकार्यकारी (सामान्य प्रशासन) श्री. काळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
पडेल ग्रामपंचायतीला स्व. आप्पासाहेब खेडकर जिल्हास्तरीय पुरस्कार २०२३-२०२४ (शौचालय व्यवस्थापन) प्राप्त झाला आहे. ग्रामपंचायत पडेल जिल्हात १ नंबर प्राविण्य प्राप्त म्हणून सन्मान मिळविला आहे. हा पुरस्कार सरपंच भूषण पोकळे यांनी स्विकारला. हा पुरस्कार मिळविण्यात सर्व मेहनत कर्मचारी वृंद आणि गावातील सर्व ग्रामस्थांचे आहे. त्यांनी ग्रामपंचायतचे म्हणणे समजून घेत घर तिथे शौचालय उपक्रम राबवला, असे सरपंच पोकळे म्हणाले.