श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर, शिरवल येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण आणि हरिनाम सप्ताहाचे आयोजन

श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर, शिरवल येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण आणि हरिनाम सप्ताहाचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर, शिरवल येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण आणि हरिनाम सप्ताहाचे आयोजन **

*रविवार २७ एप्रिल ते रविवार, ४ मे या कालावधीत होणार विविध धार्मिक कार्यक्रम*

*कणकवली ः प्रतिनिधी*

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीचे औचित्याने वै. गुरुवर्य ह.भ.प. विवेकानंद (दादा) वासकर महाराज पंढरपूर यांच्या कृपार्शिवादाने व ह.भ.प. काशिनाथ फोकमारे महाराज, शेगाव यांच्या मार्गदर्शनाने श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, शिरवल टेंबवाडी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण व १० वा वर्धापनदिन सोहळा रविवार, दि. २७ एप्रिल २०२५ ते रविवार, दि.०४ मे २०२५ पर्यंत आयोजित केलेला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन रविवार, दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.०० वा..श्री. जगदिश कातकर (प्रांताधिकारी, कणकवली). श्री. दिक्षांत देशपांडे (तहसिलदार, कणकवली) यांच्या हस्ते तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग, सर्व वारकरी व शिरवल गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत होणार आहे.

यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी व्यासपीठ व मार्गदर्शन
ह.भ.प. काशिनाथ महाराज फोकमारे, शेगांव करणार आहेत.

*गजर माऊलीचा उत्सव किर्तनाचा*

२७ एप्रिल । ह.भ.प. शंकर उर्फ सिध्देश सावंत, शिरवल,२८ एप्रिल । ह.भ.प. प्रकाश सावंत महाराज, भिरवंडे,२९ एप्रिल । ह.भ.प. भूषण वरखले महाराज, आळंदी,३० एप्रिल । ह.भ.प. संभाजी चव्हाण महाराज, कोल्हापूर,१ मे । ह.भ.प. सचिन आळतेकर महाराज, हातकणंगले,
२ मे । ह.भ.प. आनंद जाधव महाराज, सोलापूर,३ मे । ह.भ.प. काशिनाथ फोकमारे महाराज, शेगांव
४ मे । ह.भ.प. राहुल परब महाराज, आंब्रड यांचे किर्तन होणार आहे.

*दररोज होणारे कार्यक्रम** सकाळी ५ ते ६.३० काकड आरती,* सकाळी ६.३० ते ७.३० श्रींची महापूजा,सकाळी ८ ते १२ ग्रंथवाचन, दुपारी १२.३० ते २.०० महाप्रसाद, दुपारी ३ ते ५.०० ग्रंथवाचन,सायं. ६.३० ते ७.३० हरिपाठ,रात्रौ ८ ते १० किर्तन, रात्रौ १० नंतर महाप्रसाद,१ मे २०२५ रोजी दुपारी ४.३० ते ५.३०: महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ

*३ मे २०२५ रोजी दहावा वर्धापन दिन सोहळा*
सकाळी ५ ते ६.३० : काकड आरती,सकाळी ६.३० ते ८.३० :
अभिषेक व महापूजा,सकाळी ९ ते १२ ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन ,दुपारी १ ते ३ महाप्रसाद,सायं. ४ ते ६ : ग्रंथदिंडी रवळनाथ मंदिर शिरवल पर्यंत सायं. ६.३० ते ७.३०:

दीपोत्सव,रात्रौ ८ ते १० : किर्तन ह.भ.प. काशिनाथ महाराज फोकमारे,४ मे २०२५ रोजी सका.९.३० ते ११.३० : काल्याचे किर्तन ह.भ.प. राहुल परब महाराज, आब्रंड यांचे होईल.

मूंदगसाथ ह.भ.प. निवृत्ती महाराज मेस्त्री (ओरोस), कु. गजानन राणे, कु. दर्शन गवंडळकर, श्री. संजय सावंत, कु. सचिन लाड काकड आरती : ह.भ.प.तारी महाराज, ह.भ.प. प्रकाश सावंत (भिरवंडे), ह.भ.प. सामंत, फोंडाघाट, श्री. सूर्यकांत सावंत, श्री. आबा भिसे, श्री. सदा राणे, श्री. कृष्णा सावंत, घोटगे करणार आहेत.

सर्व भाविक भक्त , वारकरी यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमास उपस्थित राहुन लाभ घ्यावा.असे आवाहन ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज आणि विश्वस्त मंडळ,श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, शिरवल च्या वतीने करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!