शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेतर्फे २८ रोजी उपोषण

शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेतर्फे २८ रोजी उपोषण

*कोंकण एक्सप्रेस*

*शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेतर्फे २८ रोजी उपोषण*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची कामे निकाली निघत नसल्याने २८ एप्रिल रोजी शिक्षणाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी जिल्हापरिषद भवन समोर शिक्षकेत्तर कर्मचारी उपोषण करणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल राणे, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव गजानन नानचे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी हे कायमच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मागण्यांकडे डोळे झाक करून दुर्लक्ष करतात. गेल्या दोन वर्षापासून भविष्य निर्वाह निधी फंडाच्या पावत्या काही शाळांना अद्याप मिळालेल्या नाहीत. पदोन्नतीचे प्रस्तावही प्रलंबित आहेत. अशा विविध मागण्यांसंदर्भात शिक्षकेत्तर संघटनेने १८ मार्च रोजी आंदोलन पुकारलेले होते. त्यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यांना चर्चेस निमंत्रित करून प्रलंबित असलेले प्रश्न आठ दिवसात निकाली काढणार असे आश्वासन दिल्याने संबंधित आंदोलन स्थगित करण्यात आले होते. परंतु दिलेल्या आश्वसनापासून एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे तरी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत वारंवार लेखी पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेटून सुद्धा प्रश्न निकाली काढल्या जात नसल्याने तसेच सहविचार सभा सभेमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने २८ एप्रिल रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भवन सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी १०.३० ते ५ वाजेपर्यंत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!