देवगड तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी हेमंत कुलकर्णी बिनविरोध

देवगड तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी हेमंत कुलकर्णी बिनविरोध

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी हेमंत कुलकर्णी बिनविरोध*

*सचिवपदी दिनेश साटम तर खजिनदारपदी महेश तेली*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या देवगड तालुका पत्रकार समितीच्या नूतन कार्यकारिणी निवड सभा मंगळवारी पार पडली. यावेळी तालुकाध्यक्षपदी हेमंत कुलकर्णी, सचिवपदी दिनेश साटम तर खजिनदारपदी महेश तेली यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ, किशोर जैतापकर व लक्ष्मीकांत भावे यांनी काम पाहिले.
यावेळी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी दयानंद मांगले, अनिल राणे. सहसचिवपदी सचिन लळीत, कार्यकारिणी सदस्यपदी अयोध्याप्रसाद गावकर, सुरज कोयंडे, राजीव पडवळ, विश्वास मुणगेकर, संतोष साळसकर, नागेश दुखंडे, स्वप्नील लोके, जिल्हा प्रतिनिधी प्रशांत वाडेकर यांची पालक सदस्य व जिल्हा उपाध्यक्ष आनंद लोके यांची पदसिद्ध सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. निरीक्षक संतोष राऊळ, लक्ष्मीकांत भावे व किशोर जैतापकर यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले. त्यानुसार अध्यक्ष पदासाठी दयानंद मांगले व हेमंत कुलकर्णी असे दोघे इच्छुक होते. यावेळी दयानंद मांगले यांनी माघार घेतल्याने हेमंत कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उर्वरित कार्यकारिणी देखील बिनविरोध करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे निरीक्षक व सर्व पत्रकारांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!