*ग्रामसंवाद आणि जेष्ठ नागरिक भेटी उपक्रमातुन खारेपाटण पोलिसांनी जनतेशी साधला सुसंवाद*

*ग्रामसंवाद आणि जेष्ठ नागरिक भेटी उपक्रमातुन खारेपाटण पोलिसांनी जनतेशी साधला सुसंवाद*

*कोंकण एक्सप्रेस*

*ग्रामसंवाद आणि जेष्ठ नागरिक भेटी उपक्रमातुन खारेपाटण पोलिसांनी जनतेशी साधला सुसंवाद*

*पोलीस अंमलदार-चंद्रकांत माने व पोलीस कॉनस्टेबल पराग मोहिते यांनी घेतल्या नागरिकांच्या भेटी*

*पोलिसांच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून व्यक्त होतेय समाधान*

*सायबर गुन्हे, विविध कायद्याची जनजागृती , नागरिकांचे हक्क आणि अधिकार, डायल 112 कॉल बाबत माहितीचे केले सखोल मार्गदर्शन*

खारेपाटन पोलीस दुरक्षेत्र हद्दीतील गावांमध्ये जाऊन तेथील लोकांशी ग्राम संवाद तसेच ज्येष्ठ नागरिक त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचा खारेपाटण पोलिसांनी धडाका लावलेला आहे.गेले काही दिवस या उपक्रमातर्गत खारेपाटण पोलीस हे आपल्या दुरुक्षेत्र हद्दीतील गावांमध्ये जाऊन लोकांशी चर्चा सुसंवाद करून, जेष्ठ नागरिक यांच्याशी सखोल संवाद करून योग्य ते मार्गदर्शन करीत आहेत.
दि 14एप्रिल 2025 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे निमित्ताने गाव कुरंगवणे-बेर्ले या गावच्या संयुक्त ग्रामपंचायत मध्ये गावातील लोकांशी ग्राम संवाद तसेच ज्येष्ठ नागरिक यांची खारेपाटण पोलीस अंमलदार चंद्रकांत माने यांनी भेट घेतली. सदर कार्यक्रमांमध्ये लोकांना सायबर गुन्हे याबाबत माहिती, समाजातील जेष्ठ नागरिक घटकांसाठी असलेले भारतीय कायद्यानुसार त्याचे असलेले हक्क आणि अधिकार याविषयीं त्यांना सखोल माहिती पोलीस दलच्या वतीने देण्यात आली.तसेच नवीन कायद्याची जनजागृती ,डायल व112 कॉल बाबत माहिती देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तसेच त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास गावचे सरपंच -पप्पू ब्रह्मदंडे, उपसरपंच- बबलू पवार,ग्रामसेवक, शाळेचे मुख्याध्यापक,व गावचे नागरिक उपस्थित होते.
खारेपाटन पोलीस दुरक्षेत्र हद्दीतील गावांमध्ये जाऊन तेथील लोकांशी ग्राम संवाद तसेच ज्येष्ठ नागरिक त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचा खारेपाटण पोलिसांनी धडाका लावलेला आहे.या बाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त होतं आहे.आत्तापर्यंत खारेपाटण पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील खारेपाटण, खारेपाटण गुरव वाडी, खारेपाटण बसस्टॅण्ड,कोष्टीआळी,नडगिवे, चिंचवली, शिडवणे,साळीस्ते, कुरंगवणे व बेर्ले या गावांमध्ये जाऊन जनजागृती, ग्रामसंवाद, जेष्ठाच्या भेटी घेण्यात आल्या व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी खारेपाटण दूरक्षेत्र चे पोलीस अंमलदार -चंद्रकांत माने, पोलीस कॉनस्टेबल -पराग मोहिते यांनी मार्गदर्शन केले.यावेळी ज्या ज्या गावात ग्रामसंवाद व जेष्ठ नागरिक भेटी घेण्यात आल्या त्यावेळी त्या -त्या गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व सर्व नागरिक उपस्थित होते.पोलिसांच्या या ग्रामसंवाद आणि जेष्ठ नागरिक भेटी व मार्गदर्शन या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!