*पंचायत समिती, सावंतवाडी येथे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांचे बेमुदत उपोषण सुरू*

*पंचायत समिती, सावंतवाडी येथे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांचे बेमुदत उपोषण सुरू*

*कोंकण एक्सप्रेस*

*पंचायत समिती, सावंतवाडी येथे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांचे बेमुदत उपोषण सुरू*

*सावंतवाडी प्रतिनिधी*

गाव मौजे निगुडे सरपंच श्री. लक्ष्मण गंगाराम निगुडकर यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी १५ वित्त आयोगातील ग्रामपंचायत स्तर मधून इमारत रंगकाम करणे निगुडे गावठाणवाडी अंगणवाडी येथील कामासंदर्भात जी रक्कम अदा केली ती संबंधित काम करणारे ठेकेदाराला अदा करता अन्य ठिकाणी आपली डी. एस. सी. वापरून पी. एफ. एम. एस. खात्यात रक्कम जमा करून गैरव्यवहार केले यासंदर्भात गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी श्री. वासुदेव नाईक यांना श्री. गुरुदास गवंडे यांनी पत्रव्यवहार केला. २५ मार्च २०२५ रोजी व त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सरपंच निगुडे यांनी आर्थिक गैर व्यवहार केलेला आहे. व या आर्थिक गैरवराची खातेनिहाय चौकशी करून संबंधित सरपंच यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता यांच्या अंतर्गत ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ प्रमाणे कारवाई करण्यात यावी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली होती परंतु त्यांची मागणी मान्य न झाल्यामुळे आज सकाळी ठीक १०:०० वा पंचायत समिती, सावंतवाडी या ठिकाणी त्यांचे उपोषण सुरू आहे उपोषणस्थळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. व्ही. एम. नाईक , ग्रामविस्तार अधिकारी श्री गजानन धर्णे यांनी भेट घेतली असता सदर गोष्ट ही सरपंचाकडून चुकीच्या व नजरचुकीने झालेली आहे त्यामुळे त्यांच्यावर असा गुन्हा लावता येणार नाही असं म्हणणं गटविकास अधिकारी सांगितल्यामुळे याला गुरुदास गावंडे यांनी उत्तर दिलं की सदरचा निधी हा जर चुकीच्या पद्धतीने ट्रान्सफर केला गेला तर रक्कम खात्यात जमा व्हायला उशीर का लागला २७ फेब्रुवारी २०२५ रोजी खात्यात रक्कम सरपंचांनी हस्तांतरण केली व सदरची रक्कम ही ०४ एप्रिल २०२५ रोजी ग्राम निधीमध्ये तब्बल ३८ दिवसांनी कशी काय जमा झाली. म्हणजे ही अनियमित आणि आर्थिक गैरवावर नाही का असा सवाल श्री गवंडे यांनी उपस्थित केला मी उपोषणावर माझ्या ठाम आहे मी उठणार नाही असे त्यांनी गटविकास अधिकारी यांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!