*कोंकण एक्सप्रेस*
*जागतिक वन व जल दिनाच्या निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेत वैष्णवी हावळ, सलोनी केळकर प्रथम*
*सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी व अर्जुन रावराणे विद्यालय यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन*
*वैभववाडी वनपाल प्रकाश पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*
२१ मार्च जागतिक वन दिन व २२ मार्च जागतिक जल दिनाच्या निमित्ताने वैभववाडी येथे सामाजिक वनीकरण विभाग व अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या सांस्कृतिक विभाग व हरित सेना विभागाच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वनसंपत्ती संवर्धन व जलसंवर्धन अशा दोन विषयांवर ही चित्रकला स्पर्धा प्रशालेत आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनेतून विविध चित्रे रेखाटली इयत्ता पाचवी ते नववी अशा एकाच गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रशालेतील ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थीनींचा सहभाग लक्षणीय होता. या स्पर्धेत वनसंपत्ती संवर्धन या विषयावरील चित्रकला स्पर्धेत सलोनी केळकर हिने प्रथम क्रमांक, रिद्धी शिंदे हिने द्वितीय क्रमांक तर प्रांजल हत्तुरे हिने तृतीय क्रमांक व वेदिका रावराणे, सानिका यादव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला तसेच जलसंवर्धन या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धेत वैष्णवी हावळ हिने प्रथम क्रमांक, सानिका रावराणे हिने द्वितीय क्रमांक व स्वरा चौगले हिने तृतीय क्रमांक तर सिद्धेश भंडारी व पायल सावंत हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. या सर्व स्पर्धकांना त्यांचे वर्ग शिक्षक एक.जी. केळकर, एस.व्ही.भोसले,एस.ए.सबनिस यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परिक्षण प्रशालेचे कलाशिक्षक मंदार चोरगे व सांस्कृतिक विभाग प्रमुख विजय मरळकर यांनी केले. सध्याचे वाढते तापमान लक्षात घेता वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज असल्याचे मत प्रशालेचे शिक्षक एस.बी.शिंदे यांनी व्यक्त केले तर वन क्षेत्रात लावला जात असलेला वनवा तसेच आपल्या परिसरातील वनवा आपण रोखला पाहिजे असे आवाहन मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. वृक्षसंवर्धनाचे महत्व फार पुर्वीपासून संतांनी देखील आपल्या अभंगातून सांगितले आहे आपण देखील वृक्ष संवर्धनाचे महत्व जाणून वृक्षसंवर्धन करुया असा सल्ला वनपाल प्रकाश पाटील यांनी सर्व उपस्थितांना दिला. विजेत्या सर्व स्पर्धकांना सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी चे वनपाल प्रकाश पाटील यांच्या हस्ते व वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या उपस्थितीत फुलझाडे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, वैभववाडी वनपाल प्रकाश पाटील, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, वनरक्षक विद्या जाधव, वनरक्षक श्रद्धा दांडगे, वनरक्षक अंकित काशिद, वनमजूर तात्या ढवण प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.एस.मरळकर व आभार प्रदर्शन एन.व्ही.प्रभू यांनी केले
.