*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर अनधिकृत एलईडी फिशिंग बोटींचा उद्रेक; भाजपा कडून कारवाईची मागणी*
*मालवण : प्रतिनिधि*
पारंपारीक मच्छिमाराना उध्वस्त करणाऱ्या अनधिकृत एलईडी मासेमारीला केंद्र व राज्य सरकारने बंदी घालूनही सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर निर्विवादपणे एलईडी मासेमारी राजरोस चालू आहे. मंत्री नितेश राणे यांनी या खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर ते पारंपरिक मच्छिमार व्यावसायिकांना अपेक्षित निर्णय घेत आहेत. प्रशासनही चांगली कामगिरी करत आहे परंतु सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर एलईडी फिशिंगचा हा वाढत गेलेला अतिरेक हजारो एलईडी ट्रॉलर समोर आपल्या जिह्यातील यंत्रणेमार्फत रोखणे शक्यच नाही यासाठी जिल्ह्यातील या अनधिकृत फिशिंगचा वाढत चाललेला पारंपरिक मच्छिमारांवर होणारा अन्याय थांबवायचा असेल तर अतिरिक्त मदत आवश्यक असून या बोटीवर कारवाई करण्यासाठी नेव्ही, आर्मी तसेच राज्यातील पोलीस खात्याची मदत घेऊन या अतिरेकी मानसिकतेवर एल ई डी फिशिंग करणाऱ्या बोटींवर संयुक्त कारवाई करावी. तरच हा अतिरेक नष्ट होईल यातूनच पारंपरिक मच्छिमार उभारी घेऊ शकेल, असे निवेदन भाजपाचे मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. कुसवेकर यांना दिले आहे.

